मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दिल्या गेलेल्या शिखर सावरकर पुरस्कार २०२०च्या ऑनलाईन सोहळ्यामध्ये गेल्या वर्षी २३ ऑगस्टला पुरस्कारांर्थींची नावे घोषित करण्यात आली होती. कोरोना संसर्गामुळे त्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार मात्र गेल्या शुक्रवारी ९ जुलै २०२१ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातल्या एका छोटेखानी समारंभात प्रदान करण्यात आले.
या पुरस्कारामध्ये लोणावळा, जिल्हा पुणे येथील शिवदुर्ग मित्र या संस्थेला शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार २०२० प्रदान करण्यात आला. यात त्यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. संस्थेचे प्रतिनिधी योगेश उंबरे, ओमकार पडवळ, अनिकेत देशमुख, प्रवीण ढोकळे यांनी पुरस्कार स्वीकारला.
शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार २०२० सुरज मालुसरे या युवकाला प्रदान करण्यात आला. यामध्ये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह याचा समावेश आहे. पुरस्कारार्थींना देण्यात येणारी रक्कम गेल्या वेळीच ऑनलाईन देण्यात आली होती.
या पुरस्कारांमध्ये जीवनगौरव पुरस्कारही होता. तो कर्नल प्रेमचंद यांना त्यावेळी घोषित करण्यात आला होता.