भारतातील काही निवडक महाविद्यालयांमध्ये आर्टिफिशिअल इंजिनिअर्स, या विषयावरील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मुंबईत वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअर्स अँड व्हर्च्युअल आर्टच्या वतीने ही शाखा सुरू करण्यात आली आहे.
त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना रोबोटची निर्मिती, स्वयंचलित कार, ऑटोमोटोड फायनान्शिअल इन्व्हेस्टमेंट, व्हर्च्युअल ट्रॅव्हल बुकिंग सिस्टिम, प्रोएक्टिव्ह हेल्थकेअर मॅनेजमेंट, सोशल मीडिया मॉनिटेअरिंग, कॉन्व्हर्सेशनल मार्केटिंग या तंत्रज्ञानातील अत्यंत अद्ययावत यंत्रणेच्या अभ्यासासाठी होणार आहे.
या अभ्यासक्रमात डेटा सायन्स, बिझनेस इंटेलिजन्स, स्ट्रेटेजी, रिसर्च सायन्टिस्ट, डेटा मायनिंग इंजिनिअरिंग, मशीन लर्निंग यांचा समावेश असून यातून डिलॉईट, आयबीएम, एक्सेन्टर, अमेझॉन, लिंक्डिन, सायट्रिक्स, वेरिझॉन, सॅप लॅब्स, फ्लिपकार्ट, मायन्त्रा या ठिकाणी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
जगभरात २०५० सालापर्यंत अशा रोबोट मशीन्स येतील, ज्यांची बौद्धिक पातळी माणसाच्या बरोबरची असेल. ही बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी अलगोरिथम प्रोग्रामचा वापर करावा लागतो, जेणेकरून यंत्र माणसासारखा प्रतिसाद देईल. म्हणूनच त्या अनुषंगाने तंत्रज्ञानातील अभ्यासकाची निर्मिती आजपासूनच होणे गरजेचे आहे. काळाची ही पावले ओळखत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याचे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी वसंतदादा पाटील शिक्षण संकुल, पूर्व द्रूतगती महामार्ग, शीव, मुंबई- ४०००२२ तसेच ९८१८५९५८६१, या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करता येईल, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस अॅड. अप्पासाहेब देसाई यांनी दिली आहे.