Homeपब्लिक फिगरमाझ्या राज्यपालपदाच्या कारकीर्दीतच...

माझ्या राज्यपालपदाच्या कारकीर्दीतच झाले फैजाबादचे अयोध्या!

२२ जानेवारीला अयोध्येत प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साही वातावरणात झाली. या अयोध्या नगरीचे नाव फैजाबाद होते. ते नाव तसेच राहिले असते तर फैजाबादेत राममंदिर असे विचित्र चित्र दिसले असते, म्हणून मी उत्तर प्रदेशचा राज्यपाल असताना फैजाबादचे अयोध्या, असे नामांतर केले. अलाहाबादचे प्रयागराज केले. बॉम्बे, बंबईचे मुंबई केले, अशा शब्दांत माजी राज्यपाल पद्मभूषण राम नाईक यांनी आपल्या कारकीर्दितील कामांना उजाळा दिला.

‘कुटूंब रंगलंय काव्यात’चे सर्वेसर्वा प्रा. विसुभाऊ बापट आणि उमा बापट आयोजित ‘कोसल्येचा राम’ या सांगितिक रामकथेच्या कार्यक्रमाचे मुंबईतल्या दादरच्या शिवाजी मंदिरात हर्षोल्हासाच्या वातावरणात आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राम नाईक यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना फैजाबादचे नामांतर आपण राज्यपाल असताना घडवून आणले असल्याचा दावा केला.

उमा बापट यांनी वाल्मिकी रामायणात उल्लेखिलेल्या प्रभू रामचंद्रांच्या वयाच्या सोळा वर्षांपासूनच्या विविध घटनांचा अतिशय सुंदर पद्धतीने कथाकथन करीत प्रा. विसुभाऊ बापट, मेघा प्रभूदेसाई, रोहित प्रभूदेसाई, अर्चना दिनेश यांनी राम आणि सीतामाई यांच्या कथांमधील गीतांचे सुमधुर आवाजात गायन केले. उमा बापट यांनी श्रवणीय निरुपण केले. डॉ. किशोर खुशाले यांनी तालवाद्य तर रोहित प्रभूदेसाई यांनी तबल्यावर उत्तम साथ दिली.

नितीन सावंत आणि विजय सूर्यवंशी हे या कार्यक्रमाचे सूत्रधार असून प्रा. विसुभाऊ आणि उमा बापट दांपत्याने अवघे शिवाजी मंदिर राममय केले. प्रभू रामनामाचा गजरात अवघे सभागृह न्हाऊन निघाले. कुटूंब रंगलंय काव्यात, या कार्यक्रमाला ४३ वर्षे पूर्ण झाली असून ३१११ प्रयोग झाले असल्याची माहिती प्रा. विसुभाऊ बापट यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content