Homeपब्लिक फिगरमौदामधल्या पूल-रस्त्यांमुळे व्यवसायवृद्धी!

मौदामधल्या पूल-रस्त्यांमुळे व्यवसायवृद्धी!

नागपूरच्या मौदा तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 53वरील नागपूर वैनगंगा ब्रिज सेक्शनवर मौदा वाय जंक्शनच्या सहा लेन उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन  झाल्यामुळे रामटेक आणि मौदा हे तालुके उमेरड आणि कुही तालुक्यांना जोडले जातील तसेच या पुलामुळे नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना कनेक्टेव्हिटी मिळून येथील व्यवसायालादेखील चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल मौदा येथे केले.  

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 53वरील नागपूर वैनगंगा ब्रिज सेक्शनवर मौदा वाय जंक्शनच्या सहा लेन उड्डाणपूलांच बांधकाम, गोवरी कोरगाव राजोला मौदा येथे कन्नड नदीवरील पुलाच बांधकाम, रामटेक-मौदा मार्गाचे चौपदरीकरण त्याचप्रमाणे माथनी गावाजवळ कन्नड नदीवरील पुलाचं मजबुतीकरण या तब्बल 200 कोटींच्यावर निधीच्या तरतुदीने करण्यात येणाऱ्या चार कामांचं भूमिपूजन मौदा वाय जंक्शन त्याचप्रमाणे मौदा तालुक्यातील गोवरी या ठिकाणी गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते. या सहा लेन उड्डाणपुलाला मौदा भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत महादेव वाडीभस्मे यांचे नाव देण्याचे आश्वासनदेखील गडकरी यांनी यावेळी दिले.

उमरेड ते अंभोरा आणि पवनी ते भंडाराकडे जाणाऱ्या रस्त्यालासुद्धा पर्यावरण खात्याची परवानगी मिळाल्याने चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. भूमीपूजन झालेल्या बांधकामामुळे मौदामधील अपघातप्रवण ब्लॅक स्पॉटची दुरस्ती होणार होईल, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.

कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांनी सांगितलं की, या भूमिपूजनामुळे या तालुक्यातील दळणवळणाची सुविधा चांगली होणार असून हा मौदा, बुटीबोरी, उमरेड, कुही तालुक्याकरिता आनंदाचा क्षण आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवार यांनी या चारही प्रकल्पाबद्दल माहिती दिली.

या चारही प्रकल्पामुळे दळणवळणाची सुविधा देणाऱ्या अत्याधुनिक रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन यामार्फत सुलभ सुरक्षित प्रवास आणि मालवाहतूक होणार आहे तसेच वेळ आणि इंजिनाची बचत होऊन वाहतुकीची कोंडीसुद्धा टळणार आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content