Homeचिट चॅटतब्बल १५ वर्षांनंतर...

तब्बल १५ वर्षांनंतर राष्ट्रपती करताहेत रेल्वेप्रवास!

राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज दिल्लीच्या सफदरजंग रेल्वेस्थानकातून खास रेल्वेगाडीतून कानपूरला रवाना झाले. तब्बल १५ वर्षांनंतर देशाचे राष्ट्रपती रेल्वेने प्रवास करत आहेत. आपल्या सात दशकांतल्या रम्य आठवणींसह राष्ट्रपती कोविंद उत्तर प्रदेशातल्या आपल्या परौन्ख, या जन्मगावी भेट देणार आहेत.

राष्ट्रपतींची ही खास रेल्वेगाडी गाडी कानपूरमधील झिंझाक आणि कानपूर देहातच्या रुरा असे दोन थांबे घेईल. तेथे राष्ट्रपती आपल्या शालेय जीवनातील आणि त्यांच्या सामाजिक सेवेच्या सुरुवातीच्या दिवसांमधील जुन्या परिचितांशी संवाद साधतील.

हे दोन थांबे राष्ट्रपतींचे जन्मस्थान असलेल्या कानपूर देहातच्या परौन्ख गावाजवळ असून  तेथे त्यांच्या सन्मानार्थ २७ जूनला दोन कार्यक्रम होणार आहेत. रेल्वेगाडीत बसल्यावर राष्ट्रपती बालपणापासून देशातील सर्वोच्च पदावर पोहोचण्यापर्यंतच्या सात दशकांमधील आठवणी सोबत घेऊन प्रवास करत आहेत.

राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच आपल्या जन्मस्थळी भेट देत आहेत.  या ठिकाणी यापूर्वी भेट द्यायची त्यांची इच्छा होती. परंतु कोरोना महामारीमुळे ते शक्य झाले नाही. त्यांनी निवडलेल्या रेल्वे मार्गाने प्रवासाची पद्धत अनेक राष्ट्रपतींच्या परंपरेनुसार आहे, ज्यांनी देशाच्या निरनिराळ्या भागातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवास केला होता.

१५ वर्षांनंतर राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती रेल्वे प्रवास करणार आहे. यापूर्वी २००६ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारतीय लष्कर अकादमीत (आयएमए) कॅडेट्सच्या पासिंग आउट परेडमध्ये भाग घेण्यासाठी दिल्ली-देहरादून, असा विशेष रेल्वेने प्रवास केला होता.

इतिहासातील नोंदी दाखवतात की, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अनेकदा रेल्वे प्रवास केला होता. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी बिहार दौर्‍यादरम्यान सिवान जिल्ह्यातील त्यांचे जन्मस्थान झिरादेई येथे भेट दिली. ते छपरा येथून झिरादेईला जाण्यासाठी राष्ट्रपतींच्या विशेष रेल्वेगाडीत बसले आणि त्यांनी तिथे तीन दिवस वास्तव्य केले. त्यांनी रेल्वेने देशभर प्रवास केला.

डॉ. प्रसाद यांच्यानंतरच्या राष्ट्रपतींनीदेखील देशातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले. २८ जूनला रोजी राष्ट्रपती कोविंद कानपूर स्थानकातून रेल्वेगाडीतून लखनौला दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जातील. २९ जूनला ते विशेष विमानाने नवी दिल्लीला परतणार आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content