Monday, February 24, 2025
Homeमुंबई स्पेशलअमिताभनी दिलेल्या व्हेंटिलेटरमुळे...

अमिताभनी दिलेल्या व्हेंटिलेटरमुळे वाचले ३० जणांचे प्राण!

मुंबईतल्या शीव (सायन) परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयास (सायन हॉस्पिटल) सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘क्लास–१’ प्रकारातील २ अत्याधुनिक अतिदक्षता व्हेंटिलेटर देणगी स्वरुपात नुकतेच दिले आहेत.

या व्हेंटिलेटरबरोबरच त्यांनी मॉनिटर्स, सीआर्म ईमेज इन्टेन्सिफायर, इन्फ्युजन पंप इत्यादी सुमारे रुपये पावणे दोन कोटी किंमतीची यंत्रसामुग्रीदेखील देणगी स्वरुपात रुग्णालयास दिली आहे. या अनुषंगाने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांच्या व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने बच्चन यांचे आभार मानले आहेत.

हे दोन्ही व्हेंटिलेटर शीव रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात काही दिवसांपूर्वी कार्यान्वित करण्यात आले आहेत. या दोन्ही अत्याधुनिक ‘व्हेंटिलेटर’द्वारे गेल्या काही दिवसांत सुमारे ३० गरजू रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती शीव रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.

बच्चन यांच्याद्वारे देणगी स्वरुपात प्राप्त झालेले दोन्ही व्हेंटिलेटर संगणकीय प्रणालीवर  आधारित अत्याधुनिक व अद्ययावत व्हेंटिलेटर आहेत. या यंत्रांद्वारे ज्या रुग्णांची प्राणवायू (ऑक्सिजन) पातळी खालावलेली आहे, अथवा ज्यांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत, अशा रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी या व्हेंटिलेटरचा उपयोग केला जात आहे.

या अत्याधुनिक व्हेंटिलेटरचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे गरजू रुग्णांना १०० टक्क्यांपर्यंत प्राणवायू (ऑक्सिजन) देण्याची सुविधा यामध्ये आहे. त्याचबरोबर प्राणवायू दाब आवश्यकतेनुसार कमीजास्त करण्याची सुविधा सदर व्हेंटिलेटरमध्ये असून नळीद्वारे थेट फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधादेखील यात आहे. तसेच ‘नॉन इन्व्हेझिव्ह मास्क’ पद्धतीने ऑक्सिजन देण्याची सुविधा या व्हेंटिलेटरमध्ये आहे, अशी माहितीही डॉ. जोशी यांनी दिली.

Continue reading

अनेक फेस्टिवल गाजवणारा ‘फॉलोअर’ २१ मार्चला चित्रपटगृहात

आजवर अनेक फिल्म फेस्टिवल आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झालेला 'फॉलोअर' हा चित्रपट येत्या २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. मराठी, कन्नडा आणि हिंदी या तिन्ही...

आता ऑनलाईन क्विक कॉमर्स स्पर्धेत छोट्या दुकानदारांना मिळणार मदतीचा हात

सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये आघाडीवर असलेली किराणाप्रो ही भारतातील पहिली ओएनडीसी-संचालित क्विक कॉमर्स कंपनी बनली आहे. दक्षिणेतल्या या कंपनीकडे भारतातील आघाडीचा एआय-संचालित क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्ट वैगेरे वाढत्या ऑनलाईन क्विक कॉमर्स स्पर्धेत आता देशभरातील छोट्या...

शाळकरी मुलांसाठी गुंतवणुकीची सर्वात छोटी SIP योजना लाँच

शाळकरी मुलांना म्युच्युअल फंडाच्या दरमहा गुंतवणूक योजनांच्या (SIP) माध्यमातून शेअर मार्केटशी जोडणारी "तरुण" योजना लाँच करण्यात आली आहे. यातून दरमहा 250 रुपयांपासून गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया...
Skip to content