Homeब्लॅक अँड व्हाईटआजवरच्या सर्वात मोठ्या...

आजवरच्या सर्वात मोठ्या रत्न आणि आभूषण व्यापार प्रदर्शन मुंबईत सुरू!

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते नव्या वर्षातील पहिल्या आणि भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रत्ने आणि आभूषण व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच मुंबईत झाले. जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर आणि बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे रत्ने आणि आभूषणे निर्यात परिषद (GJEPC) या देशातील सर्वात मोठ्या व्यापार मंडळाकडून आयआयजेएस सिग्नेचर जेम अँड ज्वेलरी व्यापार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ८ तारखेपर्यंत ते खुले राहील. जीजेईपीसीच्या 16व्या आयआयजेएस सिग्नेचरमध्ये 60 देश आणि 800 भारतीय शहरांमधून आंतरराष्ट्रीय ग्राहकांसह 32 हजारांपेक्षा जास्त अभ्यागत सहभागी होतील आणि ते 1.25 लाख चौरस मीटर प्रदर्शन क्षेत्रात असलेल्या 3000+स्टॉल्सवरील 1500+ प्रदर्शकांची भेट घेतील अशी अपेक्षा आहे.

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री आणि उपकरणांसह नवी मुंबईमधील 20 एकर क्षेत्रावर इंडिया ज्वेलरी पार्क आणि सीप्झ, मुंबईतील सामाईक सुविधा केंद्र यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, असे गोयल यांनी यावेळी सांगितले.

रत्ने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या वैविध्यपूर्ण घटक आणि सामग्रीचा समावेश असलेल्या समग्र परिसंस्थेसह भारत, रत्ने आणि आभूषण उद्योगाचे जागतिक केंद्र बनू शकतो, असेही ते म्हणाले.

पायाभूत सुविधांना चालना दिल्यामुळे, रत्ने आणि आभूषण क्षेत्रात, अतिशय आधुनिक आणि कार्यक्षम वातावरणात जागतिक स्पर्धात्मकता निर्माण करण्यासाठी आणि आपल्या व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी एमएसएमईंचे सक्षमीकरण होणार आहे. दुबईत भारत-यूएई सीईपीएच्या यशानंतर आम्ही विविध देशांमध्ये विस्तारलेल्या जागतिक बाजारपेठेत आमचा प्रवेश करण्यासाठी हाँगकाँगमध्ये नवी निर्यात प्रोत्साहन परिषद सुरू करण्याच्या विचारात आहोत. ज्वेलरी डिझाईन हे आमचे यापुढील मोठ्या निर्यातीचे क्षेत्र असेल. फॅशन आणि ज्वेलरीसाठी आगामी काळात भारत हे संपूर्ण जगाचे आकर्षण केंद्र राहील, असेही त्यांनी सांगितले.

भारताला फॅशन आणि आभूषणांच्या विश्वातील वैविध्यपूर्ण रचनांचे जागतिक केंद्र बनवण्यावर भर असला पाहिजे. फॅशन आणि आभूषणे यांच्या संचामुळे भारत जगासाठी एक मान्यताप्राप्त आणि पसंतीचे विवाह पर्यटन स्थळ बनू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयआयजेएस सिग्नेचर 2024च्या उद्घाटना दरम्यान, सॉलिटेयर इंटरनॅशनलच्या आयआयजेएस सिग्नेचर विशेष आवृत्तीचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रधान उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे (आयएएस), जॉय अलुकासचे अध्यक्ष जॉय अलुकास, जीजेईपीसीचे उपाध्यक्ष किरीट भन्साली, जीजेईपीसीच्या राष्ट्रीय प्रदर्शनाचे निमंत्रक नीरव भन्साली आणि जीजेईपीसी सीओएचे सहकारी, सव्यसाची रे (ईडी, जीजेईपीसी), आदी उपस्थित होते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content