Homeब्लॅक अँड व्हाईटनौदलाने अरबी समुद्र...

नौदलाने अरबी समुद्र व एडनच्या आखातामध्ये वाढवली गस्त!

भारतीय नौदलाने मध्य/उत्तर अरबी समुद्रात सागरी गस्त ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये भरीव वाढ केली आहे आणि सैन्याची कुमक वाढवली आहे. विनाशक क्षेपणास्त्रे आणि आणि लढाऊ जहाजांचा समावेश असलेले कृतीदल सागरी सुरक्षा कार्य करण्यासाठी आणि कोणतीही घटना घडल्यास व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.

गेल्या काही आठवड्यांमध्ये लाल समुद्र, एडनचे आखात आणि मध्य/उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गाद्वारे प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांच्या सागरी सुरक्षासंबंधित घटनांमध्ये वाढ झाली आहे. भारतीय सागरी किनार्‍यापासून अंदाजे 700 नॉटिकल मैल अंतरावर एमव्ही रुएन या व्यापारी जहाजावर झालेली चाचेगिरीची घटना आणि पोरबंदरच्या दक्षिण-पश्चिम 220 नॉटिकल मैलांवर चेम प्लूटो (MV Chem Pluto) या व्यापारी जहाजावर अलीकडेच झालेला ड्रोन हल्ला भारताच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन (EEZ) जवळील सागरी घटनांमध्ये बदल झाल्याचे सूचित करते.

या घटनांना प्रतिसाद म्हणून, संपूर्ण सागरी  क्षेत्रात जागरुकता ठेवण्यासाठी लांब पल्ल्याची सागरी गस्ती विमाने आणि रिमोटली पायलेटेड एयरक्राफ्ट माध्यमातून हवाई देखरेख वाढवण्यात आली आहे. भारतीय एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन क्षेत्रात देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय नौदल तटरक्षक दलासोबत समन्वयाने कार्य करत आहे.

राष्ट्रीय सागरी संस्थांच्या समन्वयाने भारतीय नौदलाकडून एकूण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भारतीय नौदल या प्रदेशातील व्यापारी जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content