Homeकल्चर +सचिन खेडेकरांच्या आवाजात...

सचिन खेडेकरांच्या आवाजात ऐका ‘आनंदयात्री..’!

जगभरातील सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार साहित्यकृती नव्या ऑडिओबुक तंत्रज्ञानात जगभरातील साहित्यप्रेमींसोबतच मराठी साहित्यरसिकांना स्टोरीटेलवर भुरळ घालत आहेत. प्रख्यात मराठी साहित्यिकांच्या गाजलेल्या अलौकिक कथा-कादंबऱ्या ऐकण्याची नामी संधी ‘स्टोरीटेल मराठीवर’ सातत्याने साहित्यप्रेमी श्रोत्यांना उपलब्ध होत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच आयपीएस अधिकारी जयंत नाईकनवरे यांच्या ‘आनंदयात्री: पोलीस अधिकाऱ्याची डायरी’ ही थक्क करण्यारी अनुदिनी प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या धीरगंभीर आवाजात स्टोरीटेलच्या ऑडिओबुकमध्ये ऐकायला मिळणार आहे.

एकीकडे जाती-धर्मावर आधारित व्यवस्थेला घरघर लागली असताना उत्क्रांतीच्या या घुसळणीतून एक कट्टर धर्म मात्र तयार झाला आहे, तो म्हणजे पोलीसधर्म! ‘इन्साफ’ हा या धर्माचा देव, ‘सुव्यवस्था’ ही देवी तर ‘बंदोबस्त’ ही त्याची आरती आहे. त्यांच्या टेन कमांडमेन्ट्स राज्यघटनेकडून आल्या. या पुस्तकात लेखक, जयंत नाईकनवरे (IPS) याच पोलीस धर्माबद्दल सांगत आहेत. त्यांच्या अनुभवातून आलेले हे लिखाण प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजात ऑडिओबुकमध्ये स्टोरीटेलवर ऐकताना श्रोत्यांना नक्कीच आवडेल.

साहसी, थरारक काही लिहिणे हा या पुस्तकाचा हेतू नाही, हे लेखकाने प्रस्तावनेतच स्पष्ट केले असले तरी, त्यांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटनांना ते जाताजाता स्पर्श करतात. वर्धा येथे असताना पोलीस अधिकाऱ्याची पोलिसांनीच केलेली हत्त्या, कल्याण परिसरातली संघटित गुन्हेगारी, मुंबई हल्ल्याची रात्र.. या गोष्टींबद्दल त्यांनी लिहिले आहे. २६ डिसेंबरच्या काळरात्रीनंतर पहाटे, त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या अशोक कामटे यांचा मृतदेह पाहावा लागला, त्या क्षणाचं वर्णन त्यांनी अत्यंत कमी शब्दांत आणि इतके नेमके केले आहे, की सचिन खेडेकरांच्या हळुवार आवाजात ऑडिओबुकमध्ये स्टोरीटेलवर ऐकताना आपणही हेलावून जातो.

यानिमित्तानं लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांनी या पुस्तकाबद्दलचा अनुभव कथन केला आहे. ते म्हणतात “कृष्णाची गीता वेगळी आणि प्रत्येक माणसाची गीता वेगळी, तशी तुमची ही गीता वेगळी आहे. कारण प्रत्येकाचं जगणं वेगळं आहे. काही अंशी ती माझ्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे.”

आपल्या आवडीची नवनवी ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी गुगलप्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जाऊन ‘स्टोरीटेल’ हे ॲप डाऊनलोड करा. www.storytel.com या वेबसाईटवर जाऊनही हे डाऊनलोड करता येईल.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content