Friday, September 20, 2024
Homeमाय व्हॉईसयशस्वी नारद.. शिवसेना...

यशस्वी नारद.. शिवसेना गारद!

बहुतेक अनेक, विविध, असंख्य हिंदी सिनेमांचे कथानक काहीसे असे असते की, सिनेमातला खलनायक एखाद्या कुटूंबप्रमुखाला एकतर ठार मारतो किंवा खोट्या आरोपात अडकवून खूप वर्षे तुरुंगात धाडतो आणि त्या कुटूंबप्रमुखाच्या गैरहजेरीत त्याच्या संपत्तीवर कब्जा करतो. वरून कुटूंब सदस्यांना नो व्हेअर करून मोकळा होतो. असे कितीतरी हिंदी सिनेमातून दाखवतात जे आपल्याला तोंडपाठ झालेले असते. सध्या शिवसेनाही याच कथानकाप्रमाणे झाली आहे.

अर्थात सिनेमाच्या कथानकासारखे आपल्याकडे हे असे कितीतरी कुटुंबातून घडते. म्हणजे कुटूंबप्रमुख या नात्याचे अस्तित्त्व नाहीसे झाले की त्याच्या पाठी असलेल्या मालमत्तेची कुटूंब सदस्यांची व्यवसायाची इतर वाईट नजर ठेवणारे वाट लावून मोकळे होतात. या राज्याचा कुटूंबप्रमुख मुख्यमंत्री असतो, आहे आणि या कुटुंबप्रमुखाच्या बाहेर जाण्यावर, सर्वसामान्य लोकांना भेटण्यावर त्यांनी स्वतःच फार मोठी बंधने घालून घेतल्याने कुटुंबातील सदस्यांचे म्हणजे सर्वसामान्य जनतेचे हाल सध्या कुत्रेदेखील खात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

कोणी जवळ घ्यायला, मदत करायला, प्रेमाने बोलायला, नेमके समजावून सांगायला नसल्याने विशेषतः मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क करणे कठीण होऊन बसल्याने बहुतेकांचे, कुटुंबातल्या सदस्यांचे मानसिक संतुलन झपाट्याने बिघडत चालले आहे. उद्धवजी कि देवेन्द्रजी यात नेतृत्त्व म्हणून किंवा मी एक दीर्घ अनुभवी पत्रकार म्हणून माझी पहिली पसंती बाळासाहेबांचा उद्धव आहे. त्यानंतर नक्की देवेंद्र हेच नाव माझ्या जिभेवर आहे..

मराठी माणसाचे अस्तित्त्व तसेच महत्त्व टिकून राहण्यासाठी या राज्याला बाळासाहेब छाप नेतृत्त्वाची दीर्घकाळ गरज, आवश्यकता आहे. पण बाळासाहेब गेल्यानंतर काही वर्षांतच बाळासाहेबांच्या विचारांची धगधगती शिवसेना कुठेतरी गायब झाल्याचे दृश्य विशेषतः मुंबईत आणि राज्यातही पाहायला मिळते आहे. बाळासाहेब असेपर्यंत राज्यातल्या कानाकोपऱ्यात विशेषतः मुंबई महानगरात अडचणीत संकटात सापडलेल्या प्रत्येक, बहुतेक मराठी माणसाला सर्वात आधी कोणतेही पोलीस स्टेशन किंवा इतर कोणीही नजरेसमोर न येता साऱ्या मराठींची धाव त्या-त्या परिसरातल्या शिवसेना शाखेकडे व्हायची.

शिवसेना

धाव फक्त आणि फक्त शिवसेना शाखेकडे घेतली जायची, कारण शाखेत बसणारे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी छाती पुढे करून अन्याय झालेल्या मराठी माणसाला त्याच्या संकटातून बाहेर काढायचे. विशेषतः अमराठी आणि पाक विचारांच्या बहुसंख्य मुस्लिमांची त्यामुळे मुंबई किंवा राज्यातल्या मराठी माणसाला उठसुठ त्रास देण्याची हिम्मत होत नसे. पण महाआघाडी सरकार आले आणि उद्धव व शिवसेनेतल्या प्रमुख नेत्यांची जणू नसबंदी झाली की काय, असे चित्र दिसायला लागले. या महाआघाडीच्या काही धूर्त, चतुर नेत्यांनी यांची ही नसबंदी केली की काय असे आता वाटायला लागले आहे.

अपवाद एकनाथ शिंदे यांच्यासारखे. या राज्यातले अगदीच सेनेचे चार-दोन नेते जे आजही बाळासाहेब पद्धतीने त्या-त्या ठिकाणची ठाणे पद्धतीने शिवसेना पुढे हाकताना दिसताहेत. पण ठाण्याचे नेतृत्त्व करतानादेखील थेट एकनाथ शिंदे यांच्यादेखील अडचणी याच महाआघाडीमुळे वाढल्या आहेत. कारण भिवंडी, मुंब्रा, मीरा रोडसारख्या ठिकाणच्या जात्यंध मंडळींना आवर घालणे पूर्वीसारखे सोपे राहिलेले नाही.

थोडक्यात या राज्यात महाआघाडी सरकार सत्तेवर आले आणि ठाकरे कुटूंब सदस्यांनी मातोश्रीच्या बाहेर पडून जी मुख्यमंत्री किंवा मंत्री होण्यात धन्यता मानली, त्यामुळे अतिशय खुबीने शिवसेनेचा खेळ खल्लास करण्यात आला. ज्याचे वाईट प्रत्येक भाजपा नेत्यालादेखील वाटते आहे, राग मनात धरून ठेवून उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीमध्ये सामील होण्यात मोठी चूक केली आहे..

शिवसेना

आजमितीला अतिशय झपाट्याने म्हणजे केवळ १७-१८ महिन्यांत म्हणजे महाआघाडी सरकार सत्तेत व अस्तित्त्वात आल्यानंतर आपण काय बघतो तर या राज्याचे मराठी नेतृत्त्व पार दुबळे ठरलेले.. त्या नेतृत्त्वाची जागा अमराठी विशेषतः अतिशय वादग्रस्त मुसलमान नेते घेताना आपण बघतोय. म्हणजे विविध मीडियाच्या माध्यमातून सतत २४ तास बघताना, वाचताना असे वाटते किंवा कायम असा भास होतो की पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्त्व हसन मुश्रीफ करताहेत, मराठवाड्याचे नेतृत्त्व अब्दुल सत्तार करताना दिसताहेत, मुंबईत अस्लम शेख किंवा सिद्दीकी परिवाराच्या हाती जणू सारी सत्ता, अख्खी मुंबई असे बघायला मिळते तर राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यानंतरचे महत्त्वाचे नेते म्हणून नवाब मलिक यांना सतत अतिशय महत्त्व देण्यात आल्याचे जाणवते. अबू आझमी यांना महाआघाडीच्या नेत्यांमध्ये विशेष स्थान व मान आहे.

तिकडे आपल्या नेत्यांचे, मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे साधे तोंड बघणेदेखील शिवसेनेतल्या अगदी प्रमुख मंडळींनाही दुरापास्त होऊन बसले आहे. बहुसंख्य टगे मुसलमान रस्त्याने असे काही वावरतात की हे जणू मुस्लिमांचे पाकिस्थान आहे आणि अत्यंत महत्त्वाची व आतली बातमी तुम्हाला म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीस यांच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची इत्यंभूत माहिती जशी आमच्याकडे पाठवण्यात येते तशी माहिती एकाचवेळी दोघांकडून म्हणजे शिवसेना भवनातून आणि माहिती व जनसंपर्क विभागाकडून उद्धवजींच्या दिवसभरातल्या कार्यक्रमाची माहिती आम्हाला देण्यात येत असते.

या महाआघाडीच्या कालखंडात आजपर्यंतची देवेंद्र आणि उद्धव यांची दैनंदिनी जर बघितली तर आजही असे वाटते की देवेंद्र हेच या राज्याचे प्रमुख आहेत आणि उद्धव यांना जसे जमेल तसे ते अधूनमधून करतात. इतरवेळी ते काय करतात, कुठे असतात हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि माझे नेमके हेच आजही सांगणे, म्हणणे आहे की मुख्यमंत्रीपद हे अत्यंत बेरकी व अनुभवी माणसाने सांभाळायचे असते. उद्धवजी आपण हे पद स्वीकारून म्हणजे इतर सिनियर शिवसेना नेत्याला संधी न देता राज्याचे मुख्यमंत्री झालात. वरून आदित्य यांनादेखील आत घेतले. आपण एकाचवेळी स्वतःची, ठाकरे कुटुंबाची, मराठी माणसाची, शिवसेनेची किंमत कमी करून घेतली. पवारांच्या जाळ्यात तुम्ही अलगद अडकलात. येथे लिहिताना रडू येते. पण हेच सांगतो, तुमच्या या वागण्याने, निर्णयाने मराठी माणूस व राज्यातले हिंदुत्व अडचणीत सापडले, आले आहे.. 

1 COMMENT

  1. हेमंत जी निखळ अप्रतिम, उत्कृष्ट, असा लेख आहे….. विचार करायला लावणारा….. मी तर म्हणतो की, या पुळचत मुख्यमंत्र्याला हातात चाबूक घेवून भर चौकात फटकेच मारावे लागतील…… इतका घाबरट, आणि रण सोडून पळ kadhanara मुख्यमंत्री मी माझ्या २७ वर्षाच्या पत्रकारितेत आजमितीस पाहिलेला नाही….. ब्रेक दि चेन सांगून लोकांना घरात डांबायचे व आपले पाईसे orabadanyache प्रताप काही मोजके आय ए एस अधिकारी (चेहल, अजय मेहता, कुंटे, मोपलवर) यांच्याकरवी आपले बँक balance वाढवायचे असा कुटिल खेळ, अशी कुटील राजनीति हे खेळत आहेत…..
    तरी आपले अभिनंदन…… व हा. यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस हेचं योग्य आहेत असे फक्तं मीच नाही तर या राज्यातील प्रत्येक वर्ग बोलतो आहे….

Comments are closed.

Continue reading

पवार पॉवर पर्व संपल्यात जमा…

आजपर्यंत, आजतागायत मी याआधी कधीही ना लिहिले, ना म्हटले की पवार संपले. पण आता पुन्हा नव्याने पक्ष बांधू असे जाहीर सांगणारे पवार संपूर्ण, पूर्णतः संपल्यात जमा आहेत. पण ते कसे यापुढे राजकीयदृष्ट्या जिवंत राहतील, त्यांचे अस्तित्त्व कसे आणखी टिकून...

शरद पवारांचे राजीनामानाट्य म्हणजे शुद्ध बनवाबनवी!

लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते. पण ज्यांच्या हाती मतदानरुपी काठी आहे, असते ते या राज्यातले समस्त मतदार अतिशय चाणाक्ष, चतुर आणि हुशार असतात. दुर्दैवाने हे नेत्यांच्या लक्षात येत नाही. मग...

विधान परिषदेचे सभापती कोण? रामराजे की नीलमताई??

विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. तेथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई ऍडव्होकेट राहुल नार्वेकर अलीकडे अध्यक्ष झाले आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद खाली आहे. विधान परिषदेच्या सभापतीचा कार्यभार उपसभापती उद्धव सेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे असला तरी...
error: Content is protected !!
Skip to content