Homeडेली पल्सराज्य शासनाकडून शिष्यवृत्तीचे...

राज्य शासनाकडून शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख मंजूर

परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख शासनाने मंजूर केले आहेत. इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय (GR) जारी केला आहे.

शासनाने परदेशातील शिष्यवृत्तीसाठी २०२३-२४मध्ये ५० ओबीसी विद्यार्थ्यांची निवड केली असून त्यातील या वर्षातील बॅचमधील ३२ तर मागील बॅचमधील २ विद्यार्थांना १२ कोटी ८८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. ओबीसी प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या शिष्यवृत्तीचा नक्की लाभ होईल, असा विश्वास इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

Continue reading

नोव्हेंबरपासून राज्यात हवामान कोरडे; मात्र 3-4 दिवस पावसाचेच!

यंदा उन्हाळ्यातच आलेला पाऊस हिवाळा सुरू झाला तरी मुक्काम हलवायला तयार नाही. मान्सून संपला; पण मान्सूनोत्तर अवकाळी पावसाचा खेळ अजूनही सुरूच आहे. आता बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तसेच ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात...

एका फ्लॅटचे दोन करताय? सावधान!

एका मोठ्या कुटुंबाला अधिक प्रायव्हसीची गरज आहे किंवा वाढत्या शहरात भाड्याने उत्पन्न मिळवण्याची संधी आहे, अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील अनेकजण आपल्या मोठ्या अपार्टमेंट, फ्लॅटचे दोन भागांत विभाजन करण्याचा विचार करतात. हे एक सामान्य व्यावहारिक वास्तव आहे. पण, मुंबई उपनगरातील...

न्यायमूर्ती सूर्य कांत भारताचे पुढचे सरन्यायाधीश!

भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी न्यायमूर्ती सूर्य कांत यांची भारताचे पुढचे म्हणजेच 53वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. ते 23 नोव्हेंबरला आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश गवई यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत...
Skip to content