Skip to content
Homeडेली पल्सआजपासून नागपुरात राष्ट्रीय...

आजपासून नागपुरात राष्ट्रीय फायर ड्रिल स्पर्धा!

केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत नागपूरच्या राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय- एनएफएससीद्वारे राष्ट्रीय फायर ड्रिल स्पर्धा 6 आणि 7 नोव्हेंबर 2023 रोजी एनएफएससी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अनेक राज्यांचे प्रतिनिधी सहभाग घेणार असून या स्पर्धेदरम्यान राज्यांच्या अग्निशमन सेवा, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसादात त्यांचे कौशल्य यांचे प्रदर्शन केले जाणार आहे.

या स्पर्धेत लॅडर ड्रिल, वॉटर टेंडर ड्रिल, टीमवर्क आणि आपत्कालीन परिस्थितीत संसाधन व्यवस्थापनातील आव्हाने यांचा समावेश राहणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्ड विभागाचे महासंचालक ताज हसन (भारतीय पोलीस सेवा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

राष्ट्रीय फायर ड्रिल स्पर्धेतील कौशल्याचे हे उल्लेखनीय प्रदर्शन पाहण्यासाठी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातर्फे शासकीय अधिकारी, अग्निशमन सेवा व्यावसायिक आणि जनतेला आवाहन केल्या जात आहे. या स्पर्धेबाबत अधिक माहिती https://nfscnagpur.nic.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Continue reading

बहुभाषिक ॲक्शन चित्रपट ‘राजा शिवाजी’ महाराष्ट्रदिनी होणार प्रदर्शित!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी,...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला "फिल्मी कथा" हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण...