Saturday, December 21, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटसणासुदीकरीता मेलोराकडून नवीन...

सणासुदीकरीता मेलोराकडून नवीन लाइटवेट ज्‍वेलरी!

सणासुदीचा काळ जवळ आला असताना मेलोरा, या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या डी२सी लाइटवेट गोल्‍ड व डायमंड ज्‍वेलरी ब्रॅण्‍डने त्‍यांच्‍या १८,००० ट्रेण्‍डी डिझाइन्‍सच्‍या सध्याच्या पोर्टफोलिओमध्‍ये नवीन लाइटवेट ज्‍वेलरी कलेक्‍शनची भर टाकली आहे. हे कलेक्‍शन आहेत बोल्‍ड ब्‍लूम्‍स, निओ बकेट, सिल्‍व्‍हर लायनिंग, अल्टिमेट लेसवर्क अॅण्‍ड बीडिंग ग्राहक मेलोरा स्‍टोअर्सना भेट देऊ शकतात आणि या अद्भुत दागिन्‍यांचा अनुभव घेऊ शकतात. ब्रॅण्‍डने सणासुदीच्‍या काळात होणाऱ्या विक्रीमध्‍ये ५० टक्‍के वाढ संपादित करण्‍याचे मोठे लक्ष्‍य स्‍थापित केले आहे.

मेलोरा आकर्षक दरांमध्‍ये जागतिक फॅशन ट्रेण्‍ड-प्रेरित ज्‍वेलरी प्रदान करण्‍याप्रती समर्पित आहे. त्‍यांच्‍या ७० टक्‍के गोल्‍ड व डायमंड ज्‍वेलरी डिझाइन्‍सच्‍या किमती ५०,००० रूपयांपेक्षा कमी आहेत, ज्‍यामुळे अधिकाधिक ग्राहक या ज्‍वेलरी खरेदी करू शकतात.

आमचा आंतरराष्‍ट्रीय फॅशन ट्रेण्‍ड-प्रेरित ज्‍वेलरी उपलब्‍ध करून देण्‍यासह आधुनिक जीवनशैलीशी संबंधित करण्‍याचा मनसुबा आहे, असे मेलोराच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सरोजा येरामिल्‍ली म्‍हणाल्‍या की. विशेषत: सणासुदीच्‍या काळासाठी ५०० हून अधिक नवीन डिझाइन्‍सची भर करत आमची ग्राहकांना अधिकाधिक पर्याय उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेण्‍याची इच्‍छा आहे. आम्‍ही ग्राहकांना यंदा सणासुदीच्‍या काळात आकर्षकता व स्‍टाइलसह सण साजरा करण्‍यासह मदत करण्‍यास उत्‍सुक आहोत. आम्‍हाला विश्‍वास आहे की, आमच्‍या नवीन गोल्‍ड व डायमंड ज्‍वेलरी डिझाइन्‍स त्‍यांच्‍या विविध गरजांची पूर्तता करतील.

गेल्‍या वर्षभरात ब्रॅण्‍डने उल्‍लेखनीय वाढ केली आहे आणि ब्रॅण्‍डच्‍या महत्त्वाकांक्षी विस्‍तारीकरण योजनांमुळे ही गती कायम राहण्‍याची अपेक्षा आहे. मेलोरा पुढील पाच वर्षांमध्‍ये ४०० हून अधिक स्‍टोअर्स सुरू करण्‍यास सज्‍ज आहे. व्‍यापक पोहोचसह मेलोराने देशभरात आपली व्‍यापक फूटप्रिंट निर्माण केले आहे, जेथे १०,०००हून कमी लोकसंख्‍या असलेली ३०००हून अधिक शहरे, नगर व गावांपासून लाखोहून अधिक निवासी असलेल्‍या महानगरांपर्यंत त्‍यांच्‍या उत्‍पादनांची डिलिव्‍हरी केली जात आहे. मेलोराने १०० दशलक्ष डॉलर्सचा अॅन्‍युअल रिकरिंग रेव्‍हेन्‍यू (एआरआर) संपादित केला आहे आणि पुढील पाच वर्षांत विक्रीमध्‍ये १ बिलियन डॉलर्सचा उल्‍लेखनीय टप्‍पा गाठण्‍याचा संकल्‍प आहे.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content