Homeब्लॅक अँड व्हाईट263 कोटींचा बनावट...

263 कोटींचा बनावट जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघड

सीजीएसटी मुंबई, दक्षिण आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 263 कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघडकीला आणला असून यात 7.66 कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) इनपुट टॅक्स क्रेडिटचा समावेश आहे. याप्रकरणी मे. श्री बालाजी गोल्डच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

प्रधान मुख्य आयुक्त, सीजीएसटी मुंबई क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय गुप्तवार्ता एकाकाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या करचुकवेगिरी-विरोधी शाखेने तपास सुरू केला होता. केंद्रीय गुप्तवार्ता एककाकडून प्राप्त गोपनीय माहितीच्या आणि इतर माहितीच्या आधारे, मालाचा प्रत्यक्ष पुरवठा न करता पावत्या जारी करून बनावट आयटीसी मिळवणे आणि मंजूर करणे, या संदर्भात मे. श्री बालाजी गोल्ड विरोधात तपास सुरू करण्यात आला.

जीएसटी

फर्मच्या व्यवसायाच्या प्रमुख ठिकाणाहून कोणतेही कायदेशीर व्यवसाय करण्यात आले नसल्याचे, मेसर्स श्री बालाजी गोल्डच्या नोंदणीकृत परिसरात घेतलेल्या शोधमोहिमेत आढळून आले.

फर्मचा मालक 19.10.2023 रोजी तपासात सामील झाला. त्याची साक्ष नोंदवण्यात आली. त्यामध्ये त्याने या कर फसवणुकीत आपला हात असल्याचे कबूल केले. या फर्मने मालाचा पुरवठा न करता 7.66 कोटी रुपयांच्या आयटीसीसह 263 कोटी रुपयांच्या बनावट पावत्यांवर फसवून इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सीजीएसटी कायदा, 2017 च्या तरतुदींचे गंभीर उल्लंघन करून, प्रत्यक्षात माल प्राप्त न करता फसव्या पद्धतीने, अस्वीकार्य इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठीच्या बोगस पावत्या प्राप्त करण्यात आल्या होत्या.

तपासादरम्यान मिळालेले प्रत्यक्ष पुरावे आणि या करफसवणुकीत सहभागी असल्याची आरोपीची कबुली या आधारे आरोपीला, सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल 20.10.2023 रोजी सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली. त्याला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लेनेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

संभाव्य फसवणूक करणाऱ्यांना ओळखण्यासाठी आणि शोधण्यासाठी सीजीएसटी अधिकारी डेटा विश्लेषण साधनांचा वापर करत आहेत. हे प्रकरण सीजीएसटी मुंबई क्षेत्राने करचुकवेगिरी करणारे आणि बनावट आयटीसी नेटवर्कच्या विरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. करचोरी करणाऱ्यांविरुद्धची ही मोहीम सीजीएसटी अधिकारी येत्या काही दिवसात अधिक जोरदारपणे राबवणार आहेत. 

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content