पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना गुजरातमधल्या येत्या “रण” उत्सवाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
ट्विटरवर ट्विट करताना अमिताभ बच्चन यांनी कैलाश पर्वताला भेट देऊ न शकल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. कैलाश पर्वत माझ्याकरीता नेहमीच धार्मिक, कुतुहलास्पद राहिला आहे. परंतु आजपर्यंत मी प्रत्यक्ष तेथे जाऊ शकलो नाही, याचे दुःख आहे, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तोच धागा पकडून पंचप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत अमिताभ बच्चन यांना ‘रण’ महोत्सवाला तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याचे आवाहन केले आहे. माझी पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिरांची भेट खरोखरच मंत्रमुग्ध करणारी होती. येत्या आठवड्यात, गुजरातमध्ये ‘रण’ उत्सव सुरू होत आहे. मी तुम्हाला कच्छला भेट देण्याची विनंती करतो. स्टॅच्यू ऑफ युनिटीलापण तुम्ही नक्की भेट द्या, से पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

फ्रेंच अंतराळवीराच्या भारत भेटीबद्दल व्यक्त केला आनंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक ट्विट करत फ्रेंच अंतराळवीर थॉमस पेस्केट यांच्या भारत भेटीबद्दलही आनंद व्यक्त केला. थॉमस पेस्केट, आपण भारतात आलात आणि विशेषत्वाने विज्ञान, अवकाश आणि नवोन्मेष या क्षेत्रांत आमच्या तरुणांचा उत्साह आणि जिवंतपणा अनुभवला, याबद्दल आनंद वाटला, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
स्वतः लिहिलेले गरबा गाणेही केले शेअर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, नवरात्रीच्या आगमनाला, त्यांनी गेल्या आठवड्यात लिहिलेले गरबा गाणे शेअर केले. मीटब्रॉस आणि दिव्या कुमार यांनी या गरबा गाण्याला आवाज आणि संगीत दिले आहे. आपल्यामध्ये शुभ नवरात्रीचे आगमन होत असताना, गेल्या आठवड्यात मी लिहिलेले गरबा गाणे सादर करताना मला आनंद होत आहे. उत्सवाच्या या तालात आपण सर्वजण न्हाऊन जाऊयात! मी, या गरब्याला आवाज आणि संगीत दिल्याबद्दल मीटब्रॉस तसेच दिव्या कुमार यांचे आभार मानतो, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

