Homeपब्लिक फिगरशैक्षणिक आणि नाविन्यपूर्ण...

शैक्षणिक आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात पुणे नेहमीच आघाडीवर!

धर्मेंद्र प्रधान, पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात आयोजित विद्यार्थी संमेलन समारंभात सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना, प्रधान यांनी पुण्याची महती सांगितली. पुणे शहर शैक्षणिक आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात नेहमीच आघाडीवर आहे. भारतीय समाजरचनेला दिशा देण्यात पुण्याने आघाडीची भूमिका घेतली होती, आणि यामधल्या केंद्रस्थानापैकी सावित्रीबाई फुले विद्यापीठ एक होते, असा उल्लेख त्यांनी केला.

आज नव्याने उदयाला येत असलेल्या अर्थव्यवस्थाना भारत-प्रणित मॉडेल कडून अनेक अपेक्षा आहेत आणि या अपेक्षांची पूर्तता करण्याची पुण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले. शिक्षण संशोधन, धोरणात्मक निर्णय, शिक्षण, लोककल्याण-केंद्री प्रशासन आणि महिला-प्रणित विकास, वैज्ञानिक संशोधन अशा महत्त्वाच्या क्षेत्रात, पुण्याने दिलेल्या योगदानाबद्दल प्रधान यांनी आपल्या भाषणातून भर दिला.

जागतिक पर्यावरणीय आरोग्यासाठी कार्यरत आणि पुण्यात काही काळ काम केलेले प्रसिद्ध प्राध्यापक किर्क स्मिथ यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचाही त्यांनी उल्लेख केला. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना एलपीजी अनुदान देण्याच्या त्यांच्या सूचनांमुळे उज्ज्वला योजनेची सुरुवात झाली, असे प्रधान यांनी नमूद केले.

पुणे

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पुण्यात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (जीआयपीई) संस्थेच्या 29 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, इतर मान्यवर आणि शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीक्षांत समारंभात बोलतांना प्रधान यांनी आज पदवी मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना आपल्या क्षमता आणि जीवनकौशल्ये वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले. जीआयपीई ही संस्था अनेक अभिनव कल्पनांचे आगर आहे, तसेच प्रयोगशील शिक्षणाचेही केंद्र आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

पुणे

भारतातील या गुणवान युवा शक्तीच्या जोरावर, येत्या 25 वर्षात, देशात अनेक महत्वाच्या घडामोडी होणार आहेत, असे त्यांनी नमूद केले. म्हणूनच युवकांनी विचारांचा व्यापक पल्ला ठेवत समाजाच्या आकांक्षा तसेच जागतिक जबाबदाऱ्या पार पडण्याच्या दृष्टीने स्वतःची तयारी करत पुढे वाटचाल करावी.

एकविसावे शतक, ज्ञान-आधारित समाजाचे शतक राहणार असून त्यात विकास, वृद्धी, अर्थकारण आणि एकूणच समाजाच्या उभारणीसाठी ज्ञान हाच प्राथमिक आधार असेल. आज भारतीयांवर नव्या जागतिक जबाबदाऱ्या आहेत तसेच त्यांची दृष्टी आणि कृती संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारी हवी यावर त्यांनी भर दिला.

भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यापासून, ते स्वातंत्र्योत्तर काळात अनेक महत्वाची धोरणे आखतांना, यात अगदी कृषी, शिक्षण, कृषिमालाची किंमत, कुटुंब नियोजन बँकिंग आणि सहकारी चळवळ अशा अनेक विषयांवर संशोधन करून या संस्थेने मोलाचे योगदान दिले आहे, असेही प्रधान यांनी नमूद केले.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात त्यांनी सिंबायोसिस ईशान्य भवनाचे उद्घाटन केले. आजच्या कार्यक्रमात प्राज इंडस्ट्रीजचे डॉ. प्रमोद चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. एस. बी. मुजुमदार प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. के. एच. संचेती कथ्थक नृत्यांगना शमा भाटे आणि प्रसिद्ध लेखिका अरुणा ढेरे यांचाही समावेश होता.

Continue reading

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजा झाला भावूक!

गुवाहाटीत काल संध्याकाळी खेळल्या गेलेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानावर चाहत्यांचा प्रतिसाद पाहून रवींद्र जडेजा भावूक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय, रवींद्र जडेजा खलील अहमदचे चुंबन घेत असलेला एक व्हिडिओही सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. आयपीएल २०२६साठी राजस्थान...

बिहारच्या नालंदात शीतलामाता मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ परिसरातील माता शीतला मंदिरात मंगळवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. यात किमान ९ भाविक ठार, तर इतर अनेक जखमी झाले आहेत. चैत्र महिन्यातील शेवटचा मंगळवार असल्याने व महावीर जयंतीमुळे मंदिरात प्रचंड गर्दी जमली होती. बॅरिकेड्स तुटल्याने...

‘के-पॉप’चे पुनरागमन! एप्रिलपासून ‘अरिरांग’ आणि कॉन्सर्टचे तब्बल ८२ शो!

जगप्रसिद्ध के-पॉप बँड बीटीएसचे सातही सदस्य- आरएम, जिन, सुगा, जे होप, जिमिन, व्ही आणि जंग कुक हे जवळपास चार वर्षांच्या खंडानंतर 21 मार्च रोजी सोलच्या ग्वानहवामुन चौकात एकत्र आले. त्यांनी 'बीटीएस दी कमबॅक लाईव्ह अरिरांग' या भव्य मोफत कॉन्सर्टने...
Skip to content