Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबई महापालिका निवृत्तांसाठी...

मुंबई महापालिका निवृत्तांसाठी उद्यापासून पेन्शन अदालत

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतील निवृत्‍तीवेतन / कुटुंब निवृत्‍तीवेतनधारकांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्‍याच्‍या दृष्‍टीने मुंबई उपनगर जिल्‍हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उद्या, गुरूवारी (दि. ५ ऑक्‍टोबर २०२३) आणि शुक्रवारी (दि. ६ ऑक्‍टोबर २०२३) महापालिका मुख्‍यालयात ‘पेन्शन अदालत’चे आयोजन केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्‍या समिती सभागृह क्रमांक १ मध्‍ये गुरूवारी दुपारी दोन वाजता पेन्‍शन अदालतीस सुरूवात केली जाईल. बृहन्मुंबई महापालिकेचे संबंधित विभागांचे अधिकारी या पेन्‍शन अदालतमध्‍ये उपस्थित राहणार आहेत. यावेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा तक्रारकर्त्‍याशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता पुन्‍हा पेन्‍शन अदालतीस सुरूवात होईल. तक्रारकर्त्‍यांनी पेन्‍शन अदालतीत सहभागी होताना अदालतीच्या अनुषंगाने कागदपत्रे जवळ बाळगावीत, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content