Friday, October 18, 2024
Homeकल्चर +रत्न आभूषण प्रदर्शनाचे...

रत्न आभूषण प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते मुंबईत उदघाटन!

दागदागिन्यांच्या ग्राहक व आश्रयदात्या अधिकांश महिला आहेत. तरीदेखील रत्न आभूषण उद्योग क्षेत्र आजही पुरुष प्रधान आहे, हा विरोधाभास आहे. आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला पुढे येत असताना रत्न आभूषण उद्योग क्षेत्रात येण्यासाठी महिला उद्योजिकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे चौथ्या रत्न व आभूषण प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. उदघाटन सत्राला आयोजक संस्था ‘ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल’चे अध्यक्ष सैयम मेहरा, उपाध्यक्ष राजेश रोकडे, माजी अध्यक्ष आशिष पेठे, पु.ना.गाडगीळ आणि सन्सचे सौरभ गाडगीळ, सेन्को गोल्डचे शुभंकर सेन, तसेच रत्न व आभूषण क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.

रत्न व आभूषण उद्योग जगातील सर्वाधिक जुन्या उद्योगांपैकी असून या उद्योगाचे देशाच्या विकासात योगदान फार मोठे आहे. या क्षेत्रात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असून स्वित्झर्लंडने ज्या प्रमाणे घड्याळीच्या निर्मितीमध्ये नाव कमावले आहे त्याप्रमाणे भारताने रत्न आभूषण उद्योगामध्ये जगात नाव कमावले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. 

दुबई शॉपिंग फेस्टिवल प्रमाणे मुंबईचा देखील शॉपिंग फेस्टिवल सुरु करावा व या कामात रत्न आभूषण उद्योगाने पुढाकार घ्यावा अशी सूचना राज्यपालांनी केली. 

रत्न आभूषण क्षेत्रातले कामगार या उद्योगाचा कणा असून त्यांच्या कल्याणासाठी तसेच आरोग्य व सुरक्षेसाठी रत्न आभूषण परिषदेने लक्ष्य द्यावे, असेही राज्यपालांनी सांगितले. नैतिकता व प्रामाणिकपणा हा उद्योगाचा दागिना आहे असे सांगून रत्न आभूषण उद्योगाने नीतिमत्ता कसोशीने जपावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

भारतातील कारागिरांनी हाताने बनवलेली आभूषणे जगात उत्कृष्ट आहे. या उद्योगाची उलाढाल आज ७ लाख कोटी रुपये इतकी असून पुढील काही वर्षात ती १० लाख कोटी रुपये होईल असा विश्वास अध्यक्ष सैयम मेहरा यांनी व्यक्त केला. या क्षेत्रातील उद्योजकांच्या जीएसटी, कस्टम संबंधी अडचणी सोडविण्यासाठी तक्रार निवारण कक्ष सुरु करीत असल्याचे त्यांनी सांगितले. रत्न आभूषण उद्योग प्रदर्शनामध्ये ७०० स्टाल्स असून ७०,००० व्यापारी सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी राज्यपालांनी प्रदर्शनाला भेट दिली व उद्योजकांशी संवाद साधला. राज्यपालांच्या  हस्ते यावेळी ‘जीजेसी कनेक्ट’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रदर्शन दिनांक ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content