Homeब्लॅक अँड व्हाईटविद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता...

विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचे झाले आदानप्रदान!

सीएसआयआरच्या (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) जमशेदपूरमधल्या राष्ट्रीय धातुकर्म प्रयोगशाळेतील (एनएमएल) वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. सुमन तिवारी यांनी सीएसआईआर नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन एंड पॉलिसी रिसर्च (एनआईएससीपीआर राष्ट्रीय विज्ञान संवाद आणि धोरण संशोधन संस्था) आणि मे. एनसीपीएल यांचा पुढाकार आणि ज्ञान आघाडी व नॉलेज एंड अवेयरनेस मैपिंग प्लेटफॉर्म (केएएमपी) अंतर्गत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या 800 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगबाबत ज्ञानाच्या आदानप्रदान सत्राचे आयोजन केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) ही दोन क्षेत्रे एकमेकांशी खूप संबंधित क्षेत्रे असून अलिकडच्या वर्षांत त्यांचे महत्त्व आणि अनुप्रयोग लक्षणीयरीत्या वाढले असल्याचे डॉ. तिवारी यांनी स्पष्ट केले. ही क्षेत्रे मोठी तांत्रिक प्रगती करत आहेत आणि आपल्या जीवनातील विविध पैलूंना आकार देत आहेत. या विशेष सीएसआयआर-एनएमएल आणि केएएमपीच्या कार्यशाळेत आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या क्षेत्रांविषयी जाणून घेऊ, एआय व एमएलच्या रहस्यांचा शोध घेऊ आणि या प्रभावी तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊ जे आपल्या कामाच्या, जगण्याच्या आणि नवनवीन पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणत आहेत.

सीएसआयआर राष्ट्रीय धातुकर्म प्रयोगशाळा (सीएसआयआर-एनएमएल) ही खनिजे, धातू आणि साहित्य-विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक सेवा आणि मनुष्यबळ विकासाच्या विविध पैलूंसाठी समर्पित एक प्रमुख भारतीय संशोधन संस्था आहे. मटेरिअल्स इंजिनिअरिंग, धातू उत्खनन आणि पुनर्वापर, खनिज प्रक्रिया, प्रगत सामग्री आणि प्रक्रिया, विश्लेषणात्मक आणि उपयोजित रसायनशास्त्र इ. ही सीएसआयआर-एनएमएल, जमशेदपूर येथील प्रमुख संशोधन क्षेत्रे आहेत.

केएएमपी, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च आणि औद्योगिक भागीदार मे. न्यासा कम्युनिकेशन्स प्रा. लि (एनसीपीएल) यांचा एक पुढाकार आणि ज्ञान आघाडी आहे. विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्षमतांना वाव मिळावा यासाठी सर्जनशीलता, अर्थपूर्ण शिक्षण, वाचन आणि विचार कौशल्ये विकसित करणे, हा यामागचा हेतू आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content