Homeचिट चॅटसिने स्थिर छायाचित्रकार...

सिने स्थिर छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे निधन!

प्रख्यात सिने छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईतल्या राहत्या घरी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. ते अविवाहित होते. अनेक वर्षे ते एकटेच राहत होते.

दामोदर कामत यांनी स्थापन केलेल्या ‘कामत फोटो फ्लॅश’ या कंपनीमध्ये १९६६ साली वयाच्या १८व्या वर्षी ते फोटोग्राफर म्हणून रुजू झाले. वयाच्या अखेरपर्यंत फोटोग्राफर म्हणून ते काम करीत होते. त्यांच्या अनेक चित्रपटांचे स्थिरचित्रण त्यांनी केले होते.

राज कपूर यांच्या आरके बॅनरनिर्मित ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘धरम करम’, ‘हिना’ तसेच राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘अखियोंके झरोखे सें’, ‘नादिया के पार’, ‘सारांश’, ‘उपहार’, ‘गीत गाता चल’, ‘चितचोर’, ‘मैने प्यार किया’, एन. चंद्रा यांच्या ‘नरसिंहा’सह जवळपास दीडशेहून अधिक हिंदी चित्रपटांच्या स्टील फोटोग्राफीचे काम त्यांनी केले.

मराठीमध्ये दामू केंकरे दिग्दर्शित ‘सखी माझी’, कुमार सोहनी दिग्दर्शित ‘जोडीदार’, ‘तुझ्याचसाठी’ अशा अनेक मराठी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिकांसाठी त्यांनी स्थिर चित्रण केले. राज कपूर, देव आनंद, राजश्री प्रॉडक्शन्सचे बडजात्या, अभिनेत्री नर्गिस, मधुबाला, दिग्दर्शिका सई परांजपे, दामू केंकरे, एन. चंद्रा, श्रीकांत ठाकरे, कुमार सोहनी, सुभाष फडके अशा अनेक दिग्गजांसोबत सुधाकर मुणगेकर यांनी काम केले होते. मितभाषी असलेल्या सुधाकर मुणगेकर यांचे मा. भगवान दादासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी स्नेहपूर्ण संबंध होते. कन्टीन्युटी फोटोग्राफीमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते. 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content