Homeब्लॅक अँड व्हाईटखरीपाच्या पेरणीने ओलांडला...

खरीपाच्या पेरणीने ओलांडला 1088 लाख हेक्टरचा टप्पा!

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 8 सप्टेंबर 2023 पर्यंत खरीप पिकांच्या पेरणीची व्याप्ती किती क्षेत्रांमध्ये झाली आहे त्याची आठ सप्टेंबर पर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यानुसार खरीपाच्या पेरणीने 1088 लाख हेक्टरचा टप्पा ओलांडला आहे. तांदूळ, भरड, ऊस, नाचणीसह मका यांच्या लागवडीत वाढ झाली आहे तर डाळींसह तेलबियांच्या लागवडीत घट आढळून आली आहे.

अनुक्रमांकपिकाचे नावपेरणी झालेले क्षेत्रफळ (क्षेत्रफळ: लाख हेक्टरमध्ये)
20232022
1तांदूळ403.41392.81
2डाळी119.91131.17
aतूर42.9245.61
bउडीद31.8937.08
cमूग31.1133.67
dकुळीथ0.310.29
eइतर डाळी13.6814.53
3श्री अन्न अधिक भरड धान्ये182.21181.24
aज्वारी14.0815.58
bबाजरी70.8470.46
cनाचणी8.739.29
dलहान भरड धान्ये5.244.93
eमका83.3380.97
4तेलबिया191.49193.30
aशेंगदाणे43.7345.30
bसोयाबीन125.40124.06
cसूर्यफूल0.702.00
dतीळ11.9812.97
eनिगेर0.570.88
fएरंडेल9.007.94
gइतर तेलबिया0.110.14
5ऊस59.9155.65
6ताग आणि मेस्ता6.576.97
7कापूस125.00126.87
एकूण1088.501088.02

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content