Homeब्लॅक अँड व्हाईटमालदीव्जच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या...

मालदीव्जच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निरीक्षणासाठी भारताचे निवडणूक आयुक्त!

मालदीव्जच्या निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून भारताचे निवडणूक आयुक्त अरुण गोयल तीन सदस्यांच्या शिष्टमंडळाचे मालदीव्जच्या अध्यक्षीय निवडणूक 2023 चे निरीक्षक म्हणून नेतृत्त्व करत आहेत. या निवडणुकीची पहिली फेरी 9 सप्टेंबर 2023 रोजी झाली. यासाठी 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मालदीव्जच्या 2008च्या राज्यघटनेनुसार निवडणूक (सार्वत्रिक) कायदा, 2008, अध्यक्षीय निवडणूक कायदा, 2008 आणि अध्यक्षीय निवडणूक नियम आणि नियमन 2008 अन्वये ही निवडणूक घेण्यात आली.

मालदीव्जच्या निवडणूक कायद्या अंतर्गत पाच वर्षांसाठी अध्यक्षांची निवड थेट लोकांकडून सार्वत्रिक आणि गुप्त मतदान पद्धतीने केली जाते. अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी फर्स्ट पास्ट द पोस्ट पद्धतीच्या मतदान प्रणालीचा अवलंब केला जातो. उमेदवाराला निवडणुकीत विजयी होण्यासाठी एका किवा त्यापेक्षा जास्त फेऱ्यांमध्ये एकूण मतांच्या किमान 50% मते प्राप्त करणे गरजेचे असते. मालदीव्जच्या निवडणूक आयोगामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि तीन इतर आयुक्तांचा समावेश आहे. अध्यक्षीय निवडणुकीसाठी 2,82,395 पात्र मतदार (1,44,199 पुरुष आणि 1,38,196 महिला मतदार ) आहेत. यासाठी 574 मतपेट्या (पोलिंग बूथ) आहेत आणि प्रत्येक मतपेटीमध्ये कमाल 850 मतदारांची नोंद आहे. यापैकी 8 मतपेट्या परदेशात राहणाऱ्या मालदीव्जच्या नागरिकांसाठी आहेत. 

अरुण गोयल यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळात निवडणूक उपायुक्त अजय भडू आणि प्रधान सचिव प्रमोद कुमार शर्मा यांचा समावेश आहे आणि या शिष्टमंडळाने माले आणि हुलहुमाले येथील 22 पोलिंग बूथना भेट दिली आणि निवडणूक प्रक्रियेचे, या प्रणालीचे आणि मतदार नोंदणी आणि ओळख पटवण्याच्या, मतदानासाठी बूथच्या व्यवस्थेसह इतर प्रक्रियांचे निरीक्षण केले आणि मालदीव्जच्या निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या उपक्रमांची नोंद घेतली. इतर देशांमधील आंतरराष्ट्रीय निरीक्षक आणि संघटनांदेखील निवडणूक निरीक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्या.

या निवडणुकीची मतमोजणी त्याच दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर 2023 रोजी झाली आणि यातील निकालानुसार कोणत्याही उमेदवाराला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवता आली नाहीत. त्यांच्या निवडणूक नियमांनुसार 30 सप्टेंबर 2023 रोजी या निवडणुकीची दुसरी फेरी होणार आहे आणि या फेरीत केवळ दोनच उमेदवार असतील ज्यांना पहिल्या फेरीत सर्वात जास्त मते मिळाली आहेत.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content