Homeब्लॅक अँड व्हाईट21वा भारत-फ्रान्स द्विपक्षीय...

21वा भारत-फ्रान्स द्विपक्षीय नौदल सराव ‘वरुण’ संप्पन्न!

भारतीय आणि फ्रेंच नौदलाच्या 21व्या ‘वरुण’, या द्विपक्षीय नौदल सरावाचा दुसरा टप्पा अरबी समुद्रात नुकताच आयोजित करण्यात आला होता. या सरावात दोन्ही बाजूंनी गायडेड क्षेपणास्त्र असलेली लढाऊ जहाजे, टँकर, सागरी गस्ती विमाने आणि नौदलाचे अविभाज्य अंग असलेल्या हलिकॉप्टर्सचा सहभाग होता. हा सराव तीन दिवस चालला आणि यात संयुक्त मोहिमा, भर समुद्रात जहाजांमध्ये इंधन भरणे आणि विविध सामरिक युक्तीकौशल्ये पाहायला मिळाली. दोन्ही नौदलाच्या चमूंनी त्यांचे युद्ध लढण्याचे कौशल्य वाढवण्याचा आणि आंतर परिचालन सुधारण्याचा आणि प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य वाढवण्याची त्यांची क्षमता प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला. ‘वरुण-2023’चा पहिला टप्पा 16 ते 20 जानेवारी 23 दरम्यान भारताच्या पश्चिम सागरी किनार्‍यावर पार पडला.

1993 पासून भारतीय आणि फ्रेंच नौदलाचा द्विपक्षीय नौदल सराव सुरु आहे. 2001 मध्ये या सरावाला नंतर ‘वरुण’ असे नाव देण्यात आले आणि तेव्हापासून हे भारत-फ्रान्स धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांचे प्रतीक बनले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सागरी कार्यक्षेत्रातील व्याप्ती विस्तारली आहे आणि त्यात गुंतागुंत वाढली आहे, या पार्श्वभूमीवर हा सराव एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धती आणि प्रक्रियांमधून शिकण्याची संधी देतो.

या सरावामुळे दोन्ही नौदलांमधील परिचालन पातळीवरील परस्पर समन्वयामध्ये सुसूत्रता आणून सागरी सुव्यवस्थेसाठी परस्पर सहकार्य वाढवता येते. जागतिक सागरी क्षेत्राची सुरक्षा, संरक्षण आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी सामायिक वचनबद्धतेला हा सराव अधोरेखित करतो.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content