Homeब्लॅक अँड व्हाईटबेहिशेबी मालमत्ताः वेस्टर्न...

बेहिशेबी मालमत्ताः वेस्टर्न कोलफिल्ड्सच्या ​​2 माजी कर्मचाऱ्यांना शिक्षा!

नागपूरच्या सीबीआय प्रकरणातील विशेष न्यायाधीशांनी वेस्टर्न कोलफिल्ड्सच्या दोघा माजी कर्मचाऱ्यांना बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणांत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

नागपूरच्या सिल्लेवाडा उप विभागात तैनात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे माजी अधिकारी एजाज हुसेन सिद्दीकी यांना 22.95 लाख रुपयांच्या दंडासह सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांची पत्नी साजिया बेगम हिला 4.50 लाख रुपयांच्या दंडासह चार वर्षे सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.

एबी इनलाइन, सिल्लेवाडा उप विभाग, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल), नागपूर येथील तत्कालीन अधिकारी एजाज हुसेन सिद्दीकी यांनी त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर बेहिशोबी स्थावर-जंगम मालमत्ता बाळगल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध सीबीआयने 1 फेब्रुवारी 2005 रोजी गुन्हा दाखल केला होता. एजाज हुसेन सिद्दीकी यांच्या नावावर आणि त्यांची पत्नी साजिया बेगम यांच्या नावावर रु.17,71,324/- इतकी संपत्ती असल्याचे तपासात उघड झाले आहे, जे त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांच्या तुलनेत जास्त आहे.

तपासाअंती दोन्ही आरोपींविरुद्ध 30 नोव्हेंबर 2006 रोजी नागपूरच्या विशेष न्यायाधीशांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले. ट्रायल कोर्टाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

अन्य एका प्रकरणात, नागपूरच्या विशेष न्यायाधीशांनी नागपूरच्या डब्ल्यूसीएलमधील तत्कालीन मेकॅनिक फिटर इर्शाद हुसेन सिद्दीकीला 13.65 लाख रुपयांच्या दंडासह पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मे, 1996 ते फेब्रुवारी 2005 या कालावधीत आरोपीने बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपाखाली सीबीआयने 30 नोव्हेंबर 2006 रोजी नागपूरच्या एबी इनलाइन, सिल्लेवाडा उप विभागातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मधील मेकॅनिक फिटर इर्शाद हुसेन सिद्दीकी विरोधात गुन्हा दाखल केला होता.

तपासात असे दिसून आले की आरोपीकडे रु. 10,77,367/- इतकी संपत्ती होती, जी त्याच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांच्या तुलनेत जास्त आहे. तपासाअंती आरोपीविरुद्ध 30 जानेवारी 2008 रोजी नागपूरच्या विशेष न्यायाधीशांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले. ट्रायल कोर्टाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. 

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content