Homeब्लॅक अँड व्हाईटनागपूर विमानतळावर 24...

नागपूर विमानतळावर 24 कोटींचे प्रतिबंधित ॲम्फेटामाइन जप्त!

नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) अधिकाऱ्यांनी नागपूरमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 20 ऑगस्टला केनियातल्या नैरोबी येथून शारजा, युएईमार्गे आलेल्या भारतीय नागरिकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून 24 कोटींचे 3.07 किलो ॲम्फेटामाइन प्रकारचा अंमली पदार्थ जप्त केला.

शारजाहून एअर अरेबिया फ्लाइट क्रमांक G9-415 द्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या प्रवाशाने त्याच्या वैयक्तिक सामानात ठेवलेल्या आयताकृती पुठ्ठयाच्या खोक्यात वेष्टित पोकळ धातूच्या रोलरमध्ये हा प्रतिबंधित पदार्थ लपवला होता. ॲम्फेटामाइन हा अंमली औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा, 1985 च्या अनुसूची  I अंतर्गत समाविष्ट असलेला एक सायकोट्रॉपिक (व्यक्तीच्या मनावर परिणाम करणारा ) पदार्थ असून त्याचा व्यापार प्रतिबंधित आहे.

या व्यक्तीला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, नागपूर यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला डीआरआय कोठडी सुनावली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून ज्या नायजेरियन नागरिकाला प्रतिबंधित पदार्थ पुरवला जाणार होता, त्याला अधिकाऱ्यांनी त्वरीत पाठपुरावा करून 21.08.2023 रोजी पश्चिम दिल्लीच्या सुभाष नगर परिसरातून अटक केली. नागपूरसारख्या छोट्या विमानतळावरून अत्यंत उत्तेजक ॲम्फेटामाइन प्रकारचा पदार्थ एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त करणे हे बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेल्या टोळ्यांकडून नवीन ठिकाणे आणि पद्धती अवलंबल्या जात असल्याचे सूचित करते. अशा टोळ्या उध्वस्त करण्यासाठी संचालनालय सातत्याने देखरेख ठेवत आहे.

Continue reading

देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम सिंधुदुर्गात साकार

सिंधुदुर्गात देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर नुकतीच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटनप्रकल्पाचा हा एक भाग...

४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

देशात गेल्या चार दिवसांत आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलच्या किंमतीत ८७ पैसे प्रति लीटर तर डिझेसच्या किंमतीत ९१ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १६ मे...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी २० मेपासून प्रवेश

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना...
Skip to content