Homeपब्लिक फिगर'अभंग एकविशी -...

‘अभंग एकविशी – तुकोबारायांची’चे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन!

जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपू्र्वी लिहिलेल्या अभंगातून २१ अभंग निवडून ते ‘अभंग एकविशी’ पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. ‘गाथा परिवार’ आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून प्रकाशित ‘अभंग एकविशी – तुकोबारायांची’ पुस्तकामुळे संत तुकाराम महाराजांचे सत्यशोधक विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करताना व्यक्त केला.

‘गाथा परिवार’ आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांच्या देवगिरी निवासस्थानी झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे,अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,आमदार अमोल मिटकरी,आमदार विक्रम काळे,आमदार सतीश चव्हाण, आमदार नितीन पवार, आमदार डॉ. किरण लहामटे, गाथा परिवाराचे अविनाश महाराज काकडे, अशोक महाराज काळे, तुलसीदास खिरोडकर, राजु चिमणकर, नंदकिशोर चिपडे, अनंत गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

जगतगुरु संत तुकाराम हे काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारांचे संत होते. त्यांच्या अभंगाना व्यावहारीकतेची जोड होती. सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार त्यांनी साहित्यात मांडले. महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी लिहिलेले अभंग आजच्या आधुनिक युगातही तितकेच समर्पक, व्यवहार्य, मार्गदर्शक आहेत. संत तुकोबारायांचे अभंग हे मानवी जीवनावरील महाभाष्य आहेत. या महाभाष्यातील २१ अभंग निवडण्याचे आणि ‘अभंग एकविशी’ पुस्तिकारुपाने प्रसिद्ध करण्याचे कठीण काम अमोल मिटकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे असेही अजित पवार म्हणाले.

‘अभंग एकविशी- तुकोबारायांची’ पुस्तिका प्रकाशनाच्या उपक्रम प्रत्यक्षात आणल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘गाथा परिवार’ तसेच आमदार अमोल मिटकरी व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या प्रचार-प्रसारासाठी ‘गाथा परिवार’, आमदार अमोल मिटकरी आणि आपल्यापैकी अनेक जण करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या.

अजित पवार

‘अभंग एकविशी’ पुस्तिकेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे अंधश्रद्धा निर्मुलन, सर्वधर्मसमभावाचे, सत्यशोधक विचार, शेतकरी, कष्टकरी, सैनिक वर्गाला दिलेला संदेश, मानवी मूल्ये रुजवण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न या साऱ्या गोष्टी, शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content