Homeब्लॅक अँड व्हाईट34 नेमबाजांना बाकू...

34 नेमबाजांना बाकू स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयाचे अर्थसहाय्य!

अझरबैजानमधील बाकू येथे होणार्‍या आगामी आयएसएसएफ नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय तुकडीच्या सदस्यांना युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय (MYAS) निधी देण्यात आला आहे. या स्पर्धेत एकूण 34 भारतीय नेमबाज सहभागी होत आहेत. ज्यामध्‍ये 17 पुरुष आणि 17 महिलांचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नेमबाजी संघाच्या 57 सदस्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. 34 नेमबाज, 15 प्रशिक्षक आणि उच्च कार्यप्रदर्शन संचालकांसह सहाय्यक कर्मचारी गटाचे 8 सदस्य यांना हे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ही जागतिक स्पर्धा 14 ऑगस्ट 2023 रोजी सुरू झाली असून 1 सप्टेंबर 2023 रोजी तिचा समारोप होईल.

संघाच्या बोर्डिंग/ लॉजिंग खर्च, विमानभाडे, व्हिसा खर्च आणि भत्ता (OPA) हे खर्च MYAS प्रशिक्षण आणि स्पर्धेची वार्षिक दिनदर्शिका (ACTC) या योजनेंतर्गत भागवले जाणार आहेत. या जागतिक स्पर्धेत भाग घेणार्‍या 34 नेमबाजांपैकी 24 टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेचे (टॉप्स) लाभार्थी तर 7 खेलो इंडिया क्रीडापटू आहेत.

पॅरिस ऑलिम्पिक वर्षात सहभाग मिळवण्याकरिता भारतासाठी ही प्रतिष्ठित स्पर्धा महत्त्वाची आहे, कारण 15 स्पर्धांमध्ये एकूण 48 ऑलिम्पिक कोटा राखीव ठेवण्यात आले आहेत. आयएसएसएफ च्या 2022 त्या आवृत्तीत नेमबाजी जागतिक स्पर्धेत भारताने 12 सुवर्ण, नऊ रौप्य आणि 13 कांस्य पदकांसह 34 पदके जिंकली होती आणि पदकतालिकेत दुसरे स्थान मिळवले होते. या स्पर्धेच्या पदकतालिकेत चीन अव्वल स्थानावर होता. 

34 Indian shooters who will be competing at the event are –

1 DIVYANSH SINGH PANWAR – TOPS Athlete

2 RAMITA – TOPS Athlete

3 AISHWARY PRATAP SINGH TOMAR – TOPS Athlete

4 MEHULI GHOSH – TOPS Athlete

5 HRIDAY HAZARIKA – TOPS Athlete

6 TOILOTTAMA SEN – TOPS Athlete

7 AKHIL SHEORAN – TOPS Athlete

8 SIFT KAUR SAMRA – TOPS Athlete

9 NIRAJ KUMAR – TOPS Athlete

10 ASHI CHOUKSEY – TOPS Athlete

11 SARABJOT SINGH – TOPS Athlete

12 MANINI KAUSHIK – TOPS Athlete

13 SHIVA NARWAL – TOPS Athlete

14 DIVYA T.S – TOPS Athlete

15 ARJUN SINGH CHEEMA – TOPS Athlete

16 ESHA SINGH – TOPS Athlete

17 ANISH – TOPS Athlete

18 PALAK – Khelo India Athlete

19 VIJAYVEER SIDHU –  TOPS Athlete

20 RHYTHM SANGWAN – TOPS Athlete

21 ADARSH SINGH – TOPS Athlete

22 MANU BHAKER – TOPS Athlete

23 PRITHVIRAJ TONDAIMAN

24 MANISHA KEER – Khelo India Athlete

25 KYNAN CHENAI – Khelo India Athlete

26 PREETI RAJAK –  Khelo India Athlete

27 ZORAVAR SINGH SANDHU

28 RAJESHWARI KUMAR

29 ANANTJEET SINGH NARUKA – Khelo India Athlete

30 GANEMAT SEKHON – TOPS Athlete

31 ANGADVIR SINGH BAJWA

32 PARINAAZ DHALIWAL – Khelo India Athlete

33 GURJOAT SINGH KHANGURA – TOPS Athlete

34 DARSHANA RATHORE – Khelo India Athlete

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content