Homeब्लॅक अँड व्हाईटसिनिमॉलला सुवर्ण कामगिरीनिमित्त...

सिनिमॉलला सुवर्ण कामगिरीनिमित्त मिळाले नवीन घर!

केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील सिनिमॉल के सेबॅस्टियन या ३९ वर्षीय दिग्गज ड्वार्फ खेळाडूने सर्व अडचणींवर विजय मिळवत जर्मनीमध्ये झालेल्या वर्ल्ड ड्वार्फ गेम्स २०२३मध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. सिनिमॉलने फ्रीस्टाइल जलतरण (२५ मी आणि ५० मीटर प्रकार), भालाफेक आणि डिस्कस थ्रोमध्ये ४ सुवर्ण पदकांसह शॉट पुट प्रकारामध्ये रौप्य पदक मिळविले. मुथूट फायनान्सने आपल्या सीएसआर उपक्रमांचा एक भाग म्हणून खेळांना प्रोत्साहन देण्याच्या बांधिलकीनुसार आणि सिनिमॉलचे विजय साजरे करण्यासाठी तिच्या प्रवासात महत्त्वपूर्ण पाठिंबा दिला, तिच्याशी संबंधित सर्व खर्च केले आणि आता मुथूट आशियाना प्रकल्पाचा एक भाग म्हणून तिला एक नवीन घर भेट म्हणून दिले आहे.

भारतातील आघाडीची सोने कर्ज एनबीएफसी मुथूट फायनान्स दिग्गज ड्वार्फ खेळाडू सिनिमॉल के सेबॅस्टियन यांना अभिमानाने पाठबळ देत आहे. कोलोन, जर्मनी येथे ८ व्या जागतिक ड्वार्फ गेम्स २०२३ मध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. १२० सेमी. उंच अॅथलीट, सिनिमॉलने उल्लेखनीय कामगिरी केली असून वर्ल्ड ड्वार्फ गेम्स २०२३ मध्ये ४ सुवर्ण आणि १ रौप्य पदकांसह पाच पदके जिंकली. ही उल्लेखनीय स्पर्धा २८ जुलै ते ५ ऑगस्ट २०२३  दरम्यान जर्मनीतील कोलोन येथे डॉईश स्पोर्ट होचस्च्युले (जर्मन क्रीडा विद्यापीठ) मध्ये झाली.

सिनिमॉल केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील ३९ वर्षीय ज्येष्ठ ड्वार्फ खेळाडू असून त्यांना फादर सोलोमन कदमबत्तू पारंबिल यांनी दिव्यांगांसाठी दर्शन सोसायटी येथे प्रशिक्षण दिले. त्यांनी नेत्रदीपक कामगिरीचे प्रदर्शन केले आणि विविध विभागांमध्ये ५ पदके जिंकली. सर्व अडथळ्यांना झुगारून त्यांनी फ्रीस्टाइल जलतरण ( २५ मी आणि ५० मीटर श्रेणी), भालाफेक, डिस्कस थ्रो आणि शॉट पुट प्रकारात १ रौप्य पदक जिंकले. केरळचे प्रतिनिधित्व करत भारतीय उपखंडासाठी ध्वजवाहक म्हणूनही त्यांना सन्मानित करण्यात आले.

सिनिमॉलच्या उल्लेखनीय कामगिरीच्या गौरवार्थ, मुथूट फायनान्सने ११ ऑगस्ट २०२३ रोजी कोचीच्या मुख्य कार्यालयात एका समारंभाचे आयोजन केले होते. मुथूट फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जॉर्ज अलेक्झांडर मुथूट यांनी सिनिमॉल यांचे स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ तसेच पारंपारिक तालवाद्य (चेंदा मेलम) देऊन स्वागत केले. या हृदयस्पर्शी विशेष समारंभाचा एक भाग म्हणून मुथूट फायनान्सने आपल्या मुथूट आशियाना प्रकल्पांतर्गत सिनिमॉलसाठी नवीन घर देण्याचे वचन दिले. मुथूट फायनान्सच्या या कृतीतून सिनिमॉलने तिच्या वाटेत आलेल्या अडचणींवर केलेली मात, तिची बांधिलकी आणि चिकाटी याबद्दल त्यांना असलेली जाण दिसून आली. तिच्या या चिकाटीमुळेच तिला वर्ल्ड ड्वार्फ गेम्स २०२३  मध्ये विजय मिळवता आला. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून मुथूट फायनान्सने सिनिमॉलला मदत करण्यासाठी ५ लाख रुपये दिले आणि संबंधित सर्व खर्चाची काळजी घेतली. 

सिनिमॉलचा असाधारण विजय आणि तिचा प्रवास याविषयी बोलताना मुथूट फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज अलेक्झांडर मुथूट म्हणाले, “जर्मनीतील वर्ल्ड ड्वार्फ गेम्स २०२३ मध्ये सिनिमॉल के सेबॅस्टियनच्या विलक्षण विजयाचे साक्षीदार होताना आम्हाला प्रचंड अभिमान वाटत आहे. संपूर्ण मुथूट परिवाराच्या वतीने मी सिनिमॉलचे तिच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन करत आहे. तिचे समर्पण आणि दुर्दम्य आकांक्षा यातून तिच्यातील खिलाडूवृत्तीचे खरे सार स्पष्ट होत आहे. भारताची अतुलनीय खेळाडू तयार करण्याची क्षमता केवळ प्रतिभेने मर्यादित नाही. परंतु त्यात मूलभूत सुविधांपर्यंत पोहोचणे आणि असमान संधी यासारखी आव्हाने यांचा अडथळा आहे हे आम्हाला माहीत आहे. खेळामुळे राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना निर्माण होते यावर आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे आम्ही क्रीडा क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत.

मुथूट फायनान्सचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर जॉर्ज एम जॉर्ज म्हणाले, वर्ल्ड ड्वार्फ गेम्स २०२३ मध्ये सिनिमॉल के सेबॅस्टियनच्या विलक्षण कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचे समर्पण आणि चिकाटी आम्हा सर्वांना प्रेरणा देते. एक खरा खेळाडू आणि अॅथलिट म्हणून सिनिमॉलने सर्व मर्यादा ओलांडून मानवी आकांक्षांचे अतूट सार दाखवून दिले. त्यांच्या अतुलनीय प्रवासाच्या भाग बनवणे, त्यांच्या आकांक्षांची जोपासणे आणि एक नवीन घर प्रदान करणे ह्याचे आमच्यासाठी खरं माननीय आहे. 

यावेळी बोलताना सिनिमॉल म्हणाल्या की, वर्ल्ड ड्वार्फ गेम्स २०२३ मधील माझ्या विजयामुळे मी खरोखरच आनंदाने फुलून गेले आहे. यासारखी कामगिरी मला अधिकाधिक यश मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि माझ्या राष्ट्राला सन्मान मिळवून देण्यासाठी प्रेरणा देते. हा प्रवास म्हणजे दृढनिश्चयाच्या सामर्थ्याची आणि माझे कुटुंब, मित्र, कुशल प्रशिक्षक आणि प्रायोजक मुथूट फायनान्स यांच्याकडून मला मिळालेल्या अतुलनीय पाठिंब्याची पावती आहे. या संपूर्ण वर्ल्ड ड्वार्फ गेम्सच्या प्रवासात मुथूट फायनान्सचे पाठबळ आणि त्यांनी माझ्या क्षमतेवर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी गेमचेंजर ठरला आहे. या नवीन घराबद्दल आणि मुथूट फायनान्सने दिलेल्या संपूर्ण प्रायोजकत्वाबद्दल मी खूप आभारी आहे. क्रीडा क्षेत्रात माझे सर्वोत्तम देण्याचा आणि भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करण्याचा माझा निर्धार आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content