Homeब्लॅक अँड व्हाईटडिजिलॉकरद्वारे पासपोर्ट अर्जप्रक्रिया...

डिजिलॉकरद्वारे पासपोर्ट अर्जप्रक्रिया सुलभ! गोव्यात प्रयोग!!

पासपोर्ट अर्जप्रक्रियेतील सुलभता वाढविण्याच्या दृष्टीने प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पणजी यांनी सर्व अर्जदारांना www.passportindia.gov.in ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी “डिजिलॉकर” सुविधेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) येथे कागदपत्रांची विनाअडथळा पडताळणी अनुभव प्रदान करून संपूर्ण प्रक्रियेचा वेळ सुलभ आणि जलद करणे हे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे.

डिजिलॉकर प्लॅटफॉर्मद्वारे, अर्जदार सहजपणे त्यांची आवश्यक सहाय्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात, पीएसके / पीओपीएसकेच्या भेटीदरम्यान मूळ कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती बाळगण्याची आवश्यकता नाही. ही सोयीस्कर प्रक्रिया अर्जदारांसाठी त्रासमुक्त  आणि जलद आणि सुलभ पडताळणी प्रक्रिया यासाठी आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आता ऑनलाइन अर्ज सादर करताना पत्ता आणि जन्मतारखेचा वैध पुरावा म्हणून डिजिलॉकर द्वारे “आधार दस्तऐवज” स्वीकारते. जे अर्जदार पत्ता / जन्मतारखेच्या पुराव्यासाठी “आधार” सादर करतात त्यांना पोर्टलमध्ये “डिजिलॉकर अपलोड” प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

अर्जदारांना डिजिलॉकर अपलोड प्रक्रिया समजणे सुलभ व्हावे यासाठी इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करण्यात आले आहेत.

इंग्रजी : https://youtu.be/M9xPGDVHib8 हिंदी: https://youtu.be/2KiW3Do0jjM

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content