मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात केलेल्या निंदनीय वक्तव्याच्या निषेधार्थ आज उत्तर-मध्य मुंबई महिला जिल्हा व चांदिवली महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्त्वाखाली चांदिवली मतदारसंघात विरोध प्रदर्शन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधीं व इतर महापुरुषांच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी नसीम खान यांनी यावेळी केली.
यावेळी मुंबई महिला अध्यक्ष अनिशा बागुल, मुंबई सेवादल अध्यक्ष सतीश मनचंदा, मुंबई उपाध्यक्ष शरीफ खान, महासचिव प्रभाकर जावकर, उत्तर-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष जगदीश आमिन, महिला जिल्हाध्यक्ष प्रियतमा सावंत, उत्तर भारतीय सेल जिल्हाध्यक्ष भरत सिंह, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष अरशद आजमी, माजी नगरसेवक अशरफ आजमी, दिलशाद आजमी, शरद पवार, सविता पवार, मसुद अंसारी यांच्यासह प्रदेश प्रतिनिधी गौस शेख, गणेश चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष माया खोत, वजीर मुल्ला यांच्यासह चांदिवली, कुर्ला आणि कलिना विधानसभेतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

