Homeब्लॅक अँड व्हाईटराष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे वार्षिक प्रगतीपुस्तक जारी!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल (25 जुलै 2023) आपल्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण केले. तंत्रज्ञानाच्या मदतीने गेल्या वर्षभरात, राष्ट्रपती भवन अधिकाधिक लोकांशी जोडले जात आहे, याबद्दल  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी समाधान व्यक्त केले. तंत्रज्ञान आणि अभिनव कल्पकतेच्या मदतीने, राष्ट्रपती भवनाचे अधिकारी ही प्रणाली अधिकाधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी पुढेही  काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती पदाच्या कारकीर्दीचे एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित अनेक उपक्रमांमध्ये द्रौपदी मुर्मु सहभागी झाल्या होत्या. यात खालील उपक्रमांचा समावेश आहे-

  1. राष्ट्रपती भवन परिसरात असलेल्या शिव मंदिराच्या पुनर्विकासाची पायाभरणी त्यांनी केली.
  2. राष्ट्रपती भवन परिसरातील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयांच्या क्रीडांगणातील क्रिकेट पव्हेलियनच्या कामाचे भूमिपूजनही त्यांनी केले.
  3. ‘नवाचार’ चे उद्घाटन – राष्ट्रपती भवनाने इंटेल इंडिया कंपनीच्या सहकार्याने विकसित केलेल्या – नवाचार या कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त गॅलरीचे त्यांनी उद्घाटन केले. या गॅलरीमध्ये विद्यार्थी आणि एआय प्रशिक्षकांनी तयार केलेले इमर्सिव म्हणजेच त्रिमिती इनोव्हेशन्स आणि देशात विकसित एआय सोल्यूशन्स प्रदर्शित केले आहेत. यात सहा संवादात्मक  प्रदर्शने असून  त्यातून राष्ट्रपती भवनाच्या भव्यतेचा अनुभव प्रेक्षकांना येतो.  त्याशिवाय, एआय कौशल्याचा सर्वसामान्यांसाठी होणारा वापर प्रेक्षकांना प्रेरणा देणारा आहे.
  4. सूत्र-कला दर्पणचे उद्घाटन – राष्ट्रपती भवनातील वस्त्र संग्रहालयाचे उद्घाटन केले. या गॅलरीमध्ये प्राचीन वस्त्रांचा एक विशेष संग्रह प्रदर्शित करण्यात आला आहे.  राष्ट्रपती भवनाच्या अभिमानास्पद वारशाचे हे एक दस्तऐवजीकरण आहे. यात जरदोजी आणि सोन्याच्या नक्षीदार मखमलीपासून तयार कार्पेट्स, बेड आणि टेबल कव्हरिंग्ज, अत्यंत तलम मलमल आणि रेशमी कपड्यांपर्यंतच्या वेगळ्या कापड परंपरांचे भांडार आहे.  या वस्त्रांचा प्रत्येक उत्कृष्ट नमुना केवळ कलात्मक कौशल्य दाखवत नाही, तर या प्रतिष्ठित भवनाच्या चिरस्थायी वारशाचा एक मौल्यवान दस्तऐवज देखील आहे.
  5. जनजातीय दर्पण या विविध आदिवासी समुदायांतील सामायिक आणि एकमेकांना जोडणाऱ्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन घडवणाऱ्या दालनाचे राष्ट्रपतींनी उद्घाटन केले.या दालनात अनाम आदिवासी स्वातंत्र्य सैनिक, हालमा सारखी पारंपरिक नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन पद्धती,डोक्रा कला, संगीत निर्माण करणारी वाद्ये, गुंजला गोंडी लेखन, कृषी आणि घरगुती उपकरणे, बांबूच्या टोपल्या, वस्त्रे, वारली, गोंडी आणि मुद कला वापरून काढलेली चित्रे, स्क्रोल, मुखवटे आणि दागिने, धातुकाम, हत्यारे, विविध प्रकारचे टॅटू दाखवणारी समकालीन छायाचित्रे, पर्यावरणातील व्यवस्था आणि राजदंड इत्यादी दर्शवणारे डायोरामा यांसारख्या विविध संकल्पनांचा समावेश आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या सहकार्याने राष्ट्रपती भवन व्यवस्थापनाने हे दालन उभारले आहे.
  6. राष्ट्रपती मुर्मु यांनी आज भारतीय राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवन यांच्या पुनर्विकसित संकेतस्थळाची सुरुवात केली. राष्ट्रपतींचे सचिव राजेश वर्मा, एनआयसीचे महासंचालक राजेश गेरा तसेच राष्ट्रपती भवन आणि एनआयसी मधील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरच्या  गेल्या एक वर्षाच्या काळात झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींचे वर्णन करणारे ई-पुस्तक देखील त्यांनी जारी केले (लिंक: https://rb.nic.in/rbebook.htm)
  7. राष्ट्रपती भवन परिसरातील आयुष स्वास्थ्य केंद्राची माहिती देणाऱ्या ‘प्रीझर्व्हिंग हेल्थ, एम्ब्रेसिंग ट्रेडीशन्स’ नामक पुस्तकाची पहिली प्रत यावेळी राष्ट्रपती मुर्मु यांना देण्यात आली.

संकेतस्थळाची सुरुवात करण्याच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या सचिवांनी केलेल्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले की गेल्या एक वर्षात राष्ट्रपती भवन व्यवस्थापनाने विविध नागरिककेंद्री उपक्रम हाती घेतले आहेत, उदा. राष्ट्रपती निवास, मशोब्रा आणि राष्ट्रपती नीलायम सामान्य जनतेसाठी वर्षभर खुले ठेवणे. यामुळे अमृत उद्यान सुरु असण्याचा कालावधी तसेच नागरिकांना भेटीसाठी देण्यात येणारे टाईम स्लॉट यामध्ये वाढ झाली असे ते म्ह्णाले.

राष्ट्रपती भवन परिसरात चौकटीबाहेरील विचारसरणीला प्रोत्सहन देणे, एकंदरीतच कार्यपद्धती सुधारणे आणि येथील रहिवासविषयक वातावरण सुधारणे या उद्देशाने येथे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्व उपक्रमांना राष्ट्रपती मुर्मु यांनी केलेले मार्गदर्शन आणि पाठींबा याबद्दल सचिवांनी त्यांचे आभार मानले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content