Homeब्लॅक अँड व्हाईटद्रूतगती, राष्ट्रीय महामार्गांवरील...

द्रूतगती, राष्ट्रीय महामार्गांवरील फलकांवर इंग्रजीबरोबर प्रादेशिक भाषा!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने  द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर चिन्हांकित फलक लावण्याच्या सुविधेबाबत मागर्दर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिलेल्या या मार्गदर्शक तत्वांमध्ये वाहनांच्या चालकांना सुधारित दृश्यमानता आणि अंतःप्रेरणात्मक मार्गदर्शन करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि जागतिक मानकांचा समावेश करुन रस्त्यांवरील सुरक्षितता वाढवण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. येथील फलकांवर इंग्रजी भाषेबरोबरच प्रादेशिक भाषा वापरण्यात येणार आहे.

या मार्गदर्शक तत्वांची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

  • वाढीव दृश्यमानता आणि सुवाच्यता : प्रतिकूल परिस्थितीत देखील महत्त्वाची माहिती चालकांना नीट दिसेल आणि समजेल याची सुनिश्चिती करून घेत, योग्य उंची/अंतरावर फलक लावणे, मोठ्या अक्षरांचा वापर, चालकांना त्वरित आकलन होईल अशी चिन्हे  आणि छोटी बोधवाक्ये यांच्या माध्यमातून रस्त्यांवरील चिन्हांकित फलकांची दृश्यमानता वाढवण्याला प्राधान्य देण्यात यावे.
  • अंतःप्रेरणादायी संवादासाठी चित्रमय वर्णन: अत्यावश्यक संदेश अधिक परिणामकारकतेने समजण्यासाठी शब्दांसोबत चित्रमय दृश्यांचा वापर करून त्यातून मर्यादित प्रमाणात साक्षर असणाऱ्यांसह रस्त्यांचा वापर करणाऱ्या विविध गटांना समजू शकेल अशा प्रकारे संदेश दिला जावा.
  • प्रादेशिक भाषा: इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषेचा वापर करून रस्त्यांवरील फलकांचे संदेश लिहिलेले असावेत, जेणेकरुन रस्त्यांचा वापर करणाऱ्या विविध प्रकारच्या लोकांमध्ये अधिक उत्तम संदेश वहन, चिन्हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि त्यातून वाहतुकीच्या नियमांचे पालन यांची सुनिश्चिती होऊ शकेल.
  • लेनची शिस्त पाळण्यावर भर: चालकांना स्पष्ट आणि प्रेरणात्मक मार्गदर्शन करून त्यांना विहित लेनचा वापर करायला प्रोत्साहन देऊन तसेच वाहतुकीची कोंडी कमी करून लेनची शिस्त अधिक उत्तम प्रकारे पाळण्याकडे विशेष लक्ष द्यावे.
  • टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी: सुरुवातीच्या टप्प्यात, ही मार्गदर्शक तत्वे नव्याने उभारले जाणारे सर्व महामार्ग, द्रुतगती महामार्ग आणि ग्रीनफिल्ड मार्गिका यांसाठी लागू करण्यात येतील. त्याबरोबरच, जेथे 20,000 पेक्षा अधिक प्रवासी गाड्यांची वाहतूक केली जाते अशा अधिक प्रमाणात वाहतूक होणाऱ्या महामार्गांना देखील या तत्वांच्या अंमलबजावणीसाठी प्राधान्य देण्यात येईल.

ही मार्गदर्शक तत्वे देशभरातील रस्ते वाहतुकीच्या मणक्यांमध्ये सुधारणा करण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेला अधोरेखित करणारी आहेत. सर्वोत्तम पद्धती आणि जागतिक मानकांचा स्वीकार करून देशातील रस्त्यांचा वापर करणाऱ्या सर्वांना सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासाचा अनुभव मिळवून देणे आणि भविष्यात न अपघात मुक्त रस्त्यांचे ध्येय साध्य करणे हा मंत्रालयाचा उद्देश आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content