Homeन्यूज अँड व्ह्यूजमत्स्यरोगावरील नियंत्रणासाठी 'रिपोर्ट...

मत्स्यरोगावरील नियंत्रणासाठी ‘रिपोर्ट फिश डिसीज’ ॲप!

मत्स्यपालन हे सर्वात जलद वाढणारे अन्न उत्पादक क्षेत्र आहे आणि प्रथिनांची वाढती मागणी पूर्ण करण्यात त्याची मोठी भूमिका आहे. मत्स्यपालनाच्या वाढीमध्ये रोग हा एक गंभीर अडथळा ठरत आहे आणि जलचर प्राण्यांच्या रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यादृष्टीने “रिपोर्ट फिश डिसीज” ॲप विकसित करण्यात आले आहे. हे ॲप केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी नुकतेच सुरू केले आहे. या नाविन्यपूर्ण ॲपचा उपयोग करून, शेतकरी त्यांच्या शेतातील फिनफिश, कोळंबी आणि मोलस्कमधील रोगाची प्रकरणे क्षेत्रीय अधिकारी आणि मत्स्य आरोग्य तज्ञांना कळवू शकतील आणि रोग समस्या त्वरित सोडवण्यासाठी वैज्ञानिक सल्ला मिळवू शकतील. हे ॲप मत्स्यपालक, क्षेत्रस्तरीय अधिकारी आणि मत्स्य आरोग्य तज्ञांना जोडण्यासाठी एक मध्यवर्ती व्यासपीठ ठरणार आहे.

अशा रोगांच्या नियंत्रणासाठी लवकर शोध घेणे महत्त्वाचे मानले जाते आणि देखरेख ठेवण्याच्या सुरचित कार्यक्रमाद्वारेच ते साध्य करता येऊ शकते. त्याचबरोबर हे क्षेत्र देशातील सुमारे 3 कोटी मच्छीमार आणि मत्स्यपालकांना उपजीविका आणि रोजगार प्रदान करते. या क्षेत्रात विकासाची अफाट क्षमता असून या क्षेत्रात नील क्रांती घडवून आणण्यासाठी भारत सरकारने 20,050 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक प्रमुख योजना “प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)) लागू केली आहे. मत्स्यपालन आणि मत्स्यसंपदा क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक असलेली देशातील ही प्रमुख योजना ठरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पित केलेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाची संकल्पना ही भारताला डिजिटली सशक्त समाज बनवणे आणि भारताला ज्ञान अर्थव्यवस्थेत रूपांतरित करणे आहे.

मत्स्य रोगाच्या समस्या समजून घेण्यासाठी अशा प्रकारच्या ॲपचा विकास करणे हे संपूर्ण मत्स्यपालन समुदायांना त्यांच्या समस्या सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन आपल्या पंतप्रधानांच्या “डिजिटल इंडिया” ची संकल्पना पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. हा “मत्स्य रोग अहवाल” देशातील सर्वात दुर्गम ठिकाणी असलेल्या सर्व मत्स्यपालन समुदायांपर्यंत पोहोचेल, जेणेकरून जलचर प्राण्यांमधील प्रत्येक रोगाची नोंद केली जाईल, तपासणी केली जाईल आणि वेळेवर वैज्ञानिक सल्ला दिला जाऊ शकेल. त्याचबरोबर अशा रोग समस्येचा सामना करावा लागलेल्या शेतकर्‍यांच्या याआधी लक्षात आलेले रोग किंवा यापूर्वी लक्षात न आलेले रोग तज्ञांपर्यंत पोहोचतील आणि कमीतकमी कालावधीत त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. अशा प्रयत्नांमुळे रोगाच्या प्रादुर्भावामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी होऊन मत्स्य उत्पादकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content