Homeब्लॅक अँड व्हाईटआंतरराष्ट्रीय वसतिगृह “मधुमास”चे...

आंतरराष्ट्रीय वसतिगृह “मधुमास”चे उद्घाटन!

गुरुपौर्णिमेच्या शुभ प्रसंगी, भारतीय कृषी संशोधन संस्थेमधील आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या ‘मधुमास’ या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाचे उद्घाटन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय कृषी  राज्यमंत्री  कैलाश चौधरी आणि कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे महासंचालक आणि सचिव डॉ. हिमांशू पाठक उपस्थित होते.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी, संशोधन, शिक्षण आणि अध्यापनात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) -भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयएआरआय) चमूचे  कौतुक केले. देशाला अन्न सुरक्षा मिळवण्याच्या दिशेने भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या योगदानाचा संपूर्ण जगाला आदर आहे,असे तोमर म्हणाले. संस्थेचे आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे वाढते प्रवेश लक्षात घेऊन,  उच्च दर्जाच्या सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यार्थी केंद्रीत वसतिगृहे भारत सरकारच्या बहुमूल्य  साहाय्याने बांधण्यात येत आहेत. सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या ‘मधुमास’ या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाच्या उद्घाटनानिमित्त त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

अमृत काळामध्ये, संस्थेला कृषी क्षेत्रातील उच्च दर्जाचे शिक्षण आणि संशोधन असलेले जागतिक विद्यापीठ बनवायचे आहे आणि हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे आंतरराष्ट्रीय वसतिगृह  एक योग्य पाऊल ठरेल, असे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रासमोर हवामान बदलांसारखी असलेली आव्हाने आणि  अन्नधान्याची वाढती मागणी आणि  शास्त्रज्ञांची वाढलेली जबाबदारी अधोरेखित करत यावर तोडगा काढण्यात भारतीय कृषी संशोधन संस्था यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री  कैलाश चौधरी यांनी आपल्या भाषणात ,आंतरराष्ट्रीय वसतिगृहाच्या बांधकामाबद्दल आनंद व्यक्त केला, यामुळे भारतीय कृषी संशोधन संस्थेला  जागतिक दर्जाचे बहु-विद्याशाखीय विद्यापीठ म्हणून विकसित होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

या वसतिगृहात 504 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय आहे  आणि त्यात एका  खाटेची सोय असलेल्या 400   खोल्या आहेत; स्नानगृह आणि स्वयंपाकघरासह एक खाट असलेल्या 56 खोल्या; आणि 48 सदनिका आहेत.वसतिगृह संकुलात  अन्नगृह , व्यायामशाळा, रेस्टॉरंट, सौर ऊर्जा प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जनरेटर आधारित  पॉवर बॅक अप, वाय-फाय नेटवर्क, आरओ यांसारख्या सुविधा आहेत. 

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content