Homeब्लॅक अँड व्हाईटविनेश फोगट, बजरंग...

विनेश फोगट, बजरंग पुनिया यांचा ‘धोबीपछाड’?

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात नवी दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलनाला बसून साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणारे ऑलिम्पिक विजेत कुस्तीपटू विनेश फोगट तसेच बजरंग पुनिया रस्त्यावरच्या आंदोलनाच्या समाप्तीनंतर लगेचच परदेशातल्या प्रशिक्षणासाठी बॅगा भरू लागल्या आहेत.

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप करत हे कुस्तीपटू आपल्या समर्थकांसह जंतरमंतरवर बऱ्याच दिवसांपासून धरणे देऊन बसले होते. काँग्रेस, आम आदमी पार्टी अशा अनेक विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. बहुचर्चित शेतकरी आंदोलनातले नेतेही या आंदोलनात सहभागी झाले होते. अनेक नेत्यांनी आंदोलकांच्या भेटी घेऊन त्यांना बळ देत होते. पोलिसांनीही या प्रकरणी बृजभूषण सिंह यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघानेही याची दखल घेत भारतीय कुस्ती महासंघाला अध्यक्षपदासाठी नव्याने निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या संसद भवनाच्या लोकार्पणाच्या वेळी हेच आंदोलक संसद भवनाच्या दिशेने कूच करणार होते. परंतु पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करून रोखल्याबद्दल सरकारवर टीकाही झाली होती. हेच ऑलिम्पिक पदकविजेते आपली पदके गंगेत विसर्जीत करण्यासाठीही गेले होते. इतके तीव्र ांदोलन केल्यानंतर मागच्याच आठवड्यात आंदोलकांनी आता रस्त्यावरची लढाई मागे घेत असल्याचे जाहीर केले आणि यापुढे आम्ही न्यायालयीन लढाई लढू, असे सांगत त्यांनी गाशा गुंडाळला आणि आता ते प्रशिक्षणासाठी परदेशवारीसाठी सज्ज होत आहेत.

भारतीय कुस्तीपटू आणि टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेतील (TOPS) खेळाडू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरांसाठी किर्गिस्तान आणि हंगेरीला जाणार आहेत.

त्यांनी आपले प्रस्ताव युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय टॉप्स टीमकडे पाठवले होते आणि त्यांनी विनंती केल्यापासून 24 तासांच्या आत ते मंजूर झाले.

ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया 36 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी किर्गिझस्तानमधील इस्सिक-कुल येथे रवाना होईल, तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेती विनेश फोगट प्रथम किर्गिझस्तानमधील बिश्केक इथे एका आठवड्याच्या प्रशिक्षणासाठी त्यानंतर हंगेरीत टाटा येथे 18 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी रवाना होईल.

विनेशबरोबर फिजिओथेरपिस्ट अश्विनी जीवन पाटील, सरावातील भागीदार संगीता फोगट आणि प्रशिक्षक सुदेश, बजरंगसोबत प्रशिक्षक सुजीत मान, फिजिओथेरपिस्ट अनुज गुप्ता, सरावातील भागीदार जितेंद्र आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग तज्ज्ञ काझी हसन असतील.

विनेश, बजरंग, आणि त्यांचे सरावातील भागीदार संगीता फोगट आणि जितेंद्र , प्रशिक्षक सुदेश आणि सुजीत मान यांचे विमानाचे तिकीट, जेवणाचा आणि राहण्याचा खर्च, शिबिराचा खर्च, विमानतळ बदलण्याचा खर्च, ओपीए आणि इतर किरकोळ खर्च केंद्र सरकार  उचलणार आहे.

याव्यतिरिक्त, कुस्तीपटूंसोबत असलेल्या इतर सहाय्यक स्टाफच्या कर्मचाऱ्यांच्या खर्चाचा भार ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट उचलेल. विनेश आणि बजरंग जुलैच्या पहिल्या आठवड्यात रवाना होतील.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content