Homeब्लॅक अँड व्हाईटविनार व इसप्रवा...

विनार व इसप्रवा ग्रुपवर आयकर विभागाचे छापे

आयकर विभागाची आलिशान स्थावर मालमत्ता विकासकांविरूद्ध शोध आणि तपासणी मोहीम पणजी येथील आयकर विभागाच्या तपास शाखेने 12 जून 2023 रोजी मेसर्स विनार ग्रुप आणि मेसर्स इसप्रवा ग्रुप या दोन प्रमुख स्थावर मालमत्ता विकासकांविरूद्ध (डेव्हलपर) व्यापक शोध आणि तपासणी मोहीम सुरू केली.

गोवा, मुंबई, दिल्ली, नोएडा आणि अमृतसरसह प्रमुख शहरांमध्ये असलेल्या एकूण 31 ठिकाणी शोध आणि सर्वेक्षण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत बंगळुरू, दिल्ली, मुंबई, गुडगाव आणि डेहराडून येथे तैनात आयकर विभागाचे पथक काल सकाळपासून छापे टाकत आहेत.

भारतातील विविध शहरांमध्ये कार्यरत असलेल्या, वायनार ग्रुप आणि इस्प्रावा ग्रुप या दोन्ही कंपन्यांची रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वदूर उपस्थिती आहे. याव्यतिरिक्त, त्यांचा ग्रुप हॉस्पिटॅलिटी विभागात कार्यरत आहे. कंपनी भारतातच नव्हे तर दक्षिण पूर्व आशियामध्ये अपार्टमेंट आणि व्हिला भाड्याने देते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content