Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबईतल्या ट्रान्झिट कॅम्पमधल्या...

मुंबईतल्या ट्रान्झिट कॅम्पमधल्या समस्या महत्त्वाच्या!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या मुंबईतील विविध विभागांमध्ये शाखा संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यावर भर दिला जात आहे. या अभियानाच्या दौऱ्यादरम्यान वांद्रे येथील एक गृहप्रकल्प रखडल्याने तेथील स्थानिक नागरिक राहत असलेल्या ट्रान्झिट कॅम्पला भेट दिली. या दरम्यान तेथे राहणाऱ्या नागरिकांच्या होत असलेल्या दुरवस्थेचे भीषण वास्तव समोर आले. या ट्रान्झिट कॅम्पप्रमाणे इतर ठिकाणीही विविध ट्रान्झिट कॅम्पमध्ये सद्यस्थितीत काही लाख नागरिक राहत आहेत. त्यांच्या या समस्या सोडविणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

हे सर्व रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनाने धोरण राबविण्याची मागणी आपण मुख्यमंत्री महोदयांकडे केली असून त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेत आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हे सर्व रखडलेले प्रकल्प कशा पद्धतीने तत्काळ मार्गी लागतील याबाबत चर्चा करण्यात आली. 

मुंबईतील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडल्याने तेथील नागरिक दुरवस्था झालेल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत. या ट्रान्झिट कॅम्पची अवस्था अत्यंत वाईट असल्याने येथे शौचालयांची व्यवस्था करणे, आसपासच्या परिसराची स्वच्छता राखणे, तेथील नागरिकांना मुबलक पाणी देणे, यासारख्या उपयोजना राबविण्याच्या सूचना यावेळी पालिका आयुक्तांना दिल्या. या रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास व्हावा यासाठी शासनाने धोरण राबविणे गरजेचे आहे. यासाठी एमएमआरडीए, म्हाडा, सिडको, एमएसआरडीसी तसेच बीएमसी यासारख्या सरकारी संस्थांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. या संस्थांच्या मदतीने सरकारने हे सर्व रखडलेले प्रकल्प मार्गी लावावे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोळीवाड्याच्या पुनर्विकासासाठी जे धोरण आखले जाणार आहे त्यावेळी स्थानिक कोळी बांधवांना विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे. स्थानिकांच्या सूचनांनुसार पुनर्विकास आराखडा तयार करावा अशा सूचना यावेळी आयुक्तांना दिल्या. त्याचप्रमाणे मुंबईतील काही भागांमध्ये आपला दवाखाना सुरू करणे, तेथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, सार्वजनिक शौचालयांची उभारणी करणे यासारख्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

मुंबईतील पर्यटनाचे आकर्षण केंद्र असलेल्या मरीन ड्राईव्हचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. यासाठी योग्य त्या उपायोजना राबविण्याच्या सूचना यावेळी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. या सुशोभिकरणासाठी काही संकल्पनाही यावेळी सुचविल्या. फोर्ट एरिया हा ‘हेरिटेज लूक’ असलेला विभाग आहे. त्यामुळे या भागाचे सुशोभिकरण त्याच पद्धतीने व्हायला हवे. यासाठी पाहिल्या टप्प्यात एशिऍटीक लायब्ररी ते हुतात्मा चौक या भागात हेरिटेज पद्धतीने सुशोभिकरण करण्यात येणार आहे, असेही यावेळी ठरविण्यात आले.

सर्वसामान्य मुंबईकरांशी निगडित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे काम महापालिका प्रशासनाने अग्रक्रमाने करावे अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावर योग्य पद्धतीने त्वरित अंमलबजावणी केली जाणार असल्याचे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी दिले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content