Homeब्लॅक अँड व्हाईटके.ई.एम. रुग्णालयात सफाई कामगारांची...

के.ई.एम. रुग्णालयात सफाई कामगारांची भरती नाही! जाहीरात बोगस!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयात सफाई कामगारांच्या भरतीबाबतचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुळात अशाप्रकारची नोकर भरतीची कोणतीही जाहिरात के.ई.एम. रुग्णालय प्रशासन किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रसारित करण्यात आलेली नाही. ही जाहिरात सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारी व चुकीची आहे. त्यामुळे या जाहिरातीस कोणीही बळी पडू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

याबाबत कोणत्याही उमेदवाराची फसवणूक झाली तर त्यास के.ई.एम. रुग्णालय प्रशासन तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे के.ई.एम. म्हणजेच रा.ए.स्मा. रुग्णालय व सेठ गो.सु. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी कळविले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून विविध समाजमाध्यमांवर खालील जाहीरत व्हायरल होत आहे.

K.E.M. हॉस्पिटल मध्ये सफाई कामगार यांची भरती आहे. आज आणि उद्या जो कोणी इच्छुक असेल त्यांनी गेट नंबर चार समोर ऑफिस तिथे जाऊन आपला अर्ज भरावा भरती डायरेक्ट बीएमसी कडून आहे कॉन्ट्रॅक्ट वर असणार पगार सतरा हजार भेटेल पुरुष व महिला दोघांसाठी आहे.

*बारावी पास ते ग्रॅज्युएशन पास फ्रेशर किंवा अनुभवी तरुण तरुणींना महानगर पालिका मतदान सर्वे एक्झिक्युटिव्ह,सर्वे सुपरवायझर.साईट मॅनेजर पदासाठी कंत्राटि तत्वावर भरती. 

कामाचे ठिकाण :- मुंबई,भायखळा,वरळी,वडाळा, माहिम,चांदिवली,गोवंडी,मागाठणे,दहिसर,दिंडोशी.

 *तारीख* :- २९ मे ते १६जून -२०२३

*एकुण रिक्त पदे* :- ५०० पेक्षा जास्त

👉 *पगार प्रती महिना* :- २०,०००/- ते ३०,०००/- +  साप्ताहिक सुट्टी

👉 ड्युटी :- ८ तास 

👉 वय :- २०ते ३०

*🙏नोकरी ईच्छुक उमेद्वारांनी मुलाखतीला येताना सोबत बायोडाटा आणि सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन येणे🙏*

*संपर्क आणि मुलाखत वेळ* :- सकाळी ११.०० ते ४.००

 *भेटा*:- अशोकराव सर 9870075729

*सूचना  – दुपारी दोन ते पाच या दरम्यान फोन करा.आपले विचार थोडक्यात बोला.

 *कृपया ही माहिती मुंबईतील नोकरी ईच्छुक उमेद्वारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी सहकार्य करा*

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content