HomeArchiveसिंह आणि कुत्री-...

सिंह आणि कुत्री- मांजरं!

Details
सिंह आणि कुत्री- मांजरं!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
आम्ही वाघ, तुम्ही उंदीर, आमची डरकाळी, तुमचे तर भिजल्या मांजरीचे म्यांऊ, विरोधकांची आमच्यासमोर काय पत्रास, ती मंडळी तर गल्लीतली कुत्री-मांजरं.. अशी प्राण्यांची नावे राजकीय नेते, पुढाऱ्यांच्या मुखातून यायला लागली की समजायचं, आल्या निवडणुका आल्या, निवडणुका जवळ आल्या.. प्रचाराच्या आधीच वाघ, सिंह, उंदीर, कुत्रे, मांजर आणि आणखी कुठल्याकुठल्या प्राण्यांची आठवण विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील मंडळींना यायला लागली आहे. रविवारी तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच जीभ घसरली. मुंबईत शीव येथे एका कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सिंहाशी केली. मोदी त्यांचे नेते आहेत, आदर्श आहेत, भारतीय जनता पार्टीचे एकमेव आधारकार्ड आहेत (अशी अनेकांची समजूत आहे) त्यामुळे फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या लोकप्रिय नेत्याची, पंतप्रधानांची स्तुती करणे यात काहीही गैर नाही. पण, त्याचबरोबर त्यांनी विरोधी पक्षनेते आणि प्रमुख मंडळींनाही गल्लीतील कुत्री-मांजरं बनवून टाकलं. मोदी सिंह आहेत आणि त्यांच्यासमोर ही विरोधी पक्षांतील मंडळी म्हणजे गल्लीतील कुत्री-मांजरंच म्हणावी लागतील, अशा आशयाचे फडणवीस यांचे वक्तव्य अनेकांना रुचलेले नाही. निदान फडणवीस यांच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती, असे बोलले जात आहे. पण प्रेम आणि लढाईत सर्व काही क्षम्य असतं, ही उक्ती खरी मानून चाललं तर फडणवीस यांचे काय चुकले असे म्हणता येईल?

निवडणुकांचा ज्वर आता प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या, कार्यकर्त्यांच्या अंगात भिनू लागला आहे. जे तोंडात येईल ते मुखाद्वारे बरळण्याचा हंगाम आता कुठे सुरू झाला आहे. फडणवीसच काय आता अनेकांच्या रसवंतीला बहार येईल. नकोनको ते शेलके शब्द, विशेषणे वापरली जातील. शिव्यांचीही खैरात होईल. आरोप, प्रत्यारोप, टेप, क्लिप सारे सारे या निवडणूक युद्धात वापरले जाणार आहे याची खात्री बाळगा. या सगळ्याची सुरुवात झालीच आहे. फडणवीस यांचे शब्द अनेकांना खटकले. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हेही आहेत. महाराष्ट्र हा सुसंस्कृतांचा देश आहे, असे त्यांनी सोमवारी प्रत्युत्तरादाखल फडणवीस यांना बजावले. आता अशोक चव्हाण यांनी नरेंद्र-देवेंद्र यांच्यावर उधळलेली मुक्ताफळे बहुदा ते विसरले असावेत. सोयीस्कर विस्मरण हे राजकारण्यांना मिळालेले एक मोठे वरदान आहे. यामुळे निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत परस्परांची खेटराने केलेली पूजा ही मंडळी निकाल लागताच विसरतात आणि गळ्यात गळे घालतात. खुळी बनवली गेलेली जनता आणि वेड लागल्यागत प्रचाराला भिडलेले कार्यकर्ते मात्र डोईचे केस उपटत नेहमीप्रमाणे सतरंज्या उचलायच्या कामाला लागतात.

अशोकराव आज सुसंस्कृत महाराष्ट्राचा दाखला देतात हे चांगलेच आहे. पण याच अशोकरावांनी नरेंद्र-देवेंद्र यांना लघवी कऱणाऱ्या मुलांची उपमा दिली होती, ते त्यांचे शब्दलालित्य आता तेच विसरले असावेत. आपल्याकडे कोरड्या धरणात मुतू का, विचारणारे अजितदादाही आहेत. पण नंतर त्यांनी आत्मक्लेष करून घेतला आणि जनतेनेही त्यांना धरण देखभालीच्या कामासाठी सत्तेतून मोकळे केले. आपले नितीनभौ गडकरी तर नंबरी माणूस. कधी काय बोलतील त्याचा नेम नाही. सध्या त्यांचे बाण दिल्लीच्या दिशेने सुटत असले तरी काही महिन्यांपूर्वी गडकरी यांनी, एकवेळ हिजड्यांना मुले होतील.. असे म्हणत जी खळबळ उडवली होती ती कोण विसरणार? विचारांची लढाई विचाराने लढावी वगैरे गोष्टी आता इतिहासजमा झाल्या राव. आता शब्दांची लढाई आहे, ज्याला जास्त शिव्या येतात, जो अधिकाधिक हीन पातळीवर येतो त्याची सरशी असा बहुदा नवीन राजकारणाचा फंडा झाला आहे.

आता लोकसभेचा आखाडा समोर आहे, लगेचच विधानसभा निवडणुकाही लागतील. कदाचित दोन्ही निवडणुका आपल्याकडे एकदम लागू शकतात. मग तर पाहायलाच नको. भाजपाकडे तोंडाळ नेत्यांची, मंत्र्यांची फौजच आहे. देशपातळीवर गेली चार वर्षे हे सातत्याने अनुभवास येत आहे. तुलनेने महाराष्ट्रात हे प्रमाण कमी असले तरी, साले तरीही रडतात, म्हणणारे नेते-मंत्री राज्यातही भाजपाकडे आहेत. शिवसेनेच्या नेत्यांकडे प्रचारकाळात वापरायच्या शब्दांचे मोठे भांडारच आहे. मर्दाची अवलाद, नामर्द, हिरवे अशांसारखे कितीएक शब्द शिवसेनेच्या दिमतीला आहेत. विकासाचे राजकारण कधीच मागे पडले आहे.

निवडणुकांचे ढोल वाजू लागले आहेत. यंदा जनतेच्या कर्णपटलांवर असलेच शब्द, शेलकी विशेषणे आदळणार आहेत. कामे किती केली, किती झाली, आश्वासने किती पूर्ण झाली याचा हिशेब मागण्याऐवजी आणि तपशील देण्याऐवजी विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षांतील फौज याच शब्दांची चिखलफेक करत मतदारांना संभ्रमित कऱणार हे नक्की आहे. प्रियंका गांधी राजकारणात आल्या म्हटल्यावर अश्लील आणि असभ्य शेरेबाजीची पातळी गाठणाऱी पगारी फौज बाळगणाऱ्या ‘सुसंस्कृत’ पक्षाने वाजपेयींची संयम आणि शालीनता गंगार्पण करत कमरेचे डोक्याला गुंडाळले आहे.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content