HomeArchiveमासे जपून खावेत..

मासे जपून खावेत..

Details
मासे जपून खावेत..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
भारताचा आघाडीचा फलंदाज दिलीप वेंगसरकर ऐन भरात होता तेव्हाची ही गोष्ट. एका कसोटी सामन्याच्या आधी वेंगसरकरने बांगडा खाल्ला. तो बाधल्यामुळे वेंगसरकर आजारी पडला. त्या कसोटी सामन्यात तो खेळू शकला नाही. भारताने तो कसोटी सामना गमावला. त्यावेळी शिरीष कणेकर यांचा क्रिकेटवरील एकपात्री भन्नाट विनोदी प्रयोगाचा शुभारंभाचा खेळ आम्ही पाहिला. कणेकरांनी आपल्या विनोदी शैलीत सुरुवातच मजेदार केली. ते म्हणाले, `भारताच्या पराभवाची अनेक कारणे शोधली जात आहेत. अनेकांना जबाबदार धरले जात आहे. पण या पराभवास कारणीभूत असलेल्या मूळ माणसाचे कोणी नावदेखील घेत नाही. तो माणूस म्हणजे भाई बंदरकर! वेंगसरकरने बांगडा खाल्ला नसता तर भारत पराभूत झाला नसता.’ कणेकरांच्या या विनोदावर त्यावेळी प्रचंड हंशा पिकल्याचे आम्हाला आठवते.

सारांश, मासे जपून खावेत हे तेव्हापासून आम्ही शिकलो आहोत. पण कोणता मासा कधी बाधेल, हे सांगता येत नाही. आता बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याचेच उदाहरण पाहा : मासे खाल्ल्याने अलर्जी झाल्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सोशल मिडीयावर आपले छायाचित्र टाकून आपल्या चाहत्यांना त्याने ही माहिती दिली आहे. मुंबईत एका कार्यक्रमाचे चित्रिकरण झाल्यानंतर सोनू बीकेसी येथे भोजनासाठी गेला होता. भोजनात मासे खाल्ल्याने सोनूला अलर्जी झाली. या अलर्जीमुळे तो 48 तास आयसीयूमध्ये होता. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर सोनूने सोशल मिडीयावर आपला डोळे सुजलेले छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यासोबत त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक संदेशदेखील दिला. `तुमचे माझ्यावर असलेले प्रेम आणि काळजी याने मी भारावून गेलो आहे. पण काल मी कोणत्या स्थितीत होतो हे तुम्हाला सांगणे पण मला गरजेचे वाटत आहे. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची अलर्जी असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका,’ असा सल्ला सोनूने आपल्या चाहत्यांना दिला आहे. जवळच असलेल्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळेच आपण वाचलो. उशीर झाला असता तर आपल्या जीवावर बेतले असते, असेही सोनूने म्हटले आहे.

वास्तविक संतांनी सांगितलेच आहे की, तोंडातून बाहेर काय टाकावे आणि तोंडात काय टाकावे, हे विचारपूर्वक ठरवायला हवे. आपण काय खावे आणि काय खाऊ नये हे प्रत्येकाने आपल्या तब्येतीनुसार ठरवायचे असते. अनेकांना अनेक प्रकारची अलर्जी असते. अंडे हे शक्तीवर्धक टॉनिक मानले जाते. पण काही लोकांना या अंड्याची अलर्जी असते. अंड्याचा कण जरी पोटात गेला, तरी या अलर्जीमुळे पोट दुखू लागते. अंड्याप्रमाणेच अनेकांना झिंगा, बांगडा, हलवा इत्यादी माशांची अलर्जी असते. पण कधीकधी त्याकडे दुर्लक्ष करून खवय्ये या पदार्थांवर ताव मारतात आणि नको ते संकट ओढवून घेतात.

सोनू निगम हा अत्यंत यशस्वी गायक आहे. गायकांनी तर खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यायची असते. घसा नीट राहील यासाठी अनेक पथ्ये पाळायची असतात. पण सोनू निगम ती पाळत नसावा असे दिसते. मासे हे खाण्यास चविष्ट असले तरी ते बाधल्यास जीवावर बेतू शकते. अनेकदा माशाचा काटा घशात अडकूनदेखील प्राणघातक संकटात लोक सापडल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच बोंबिलासारख्या माशाचे काटे चावून खाल्ल्यामुळे जुलाब झाल्याचीदेखील अनेक उदाहरणे आहेत. आमचे एक मित्र तर मासे फक्त उकडून खातात. तसे केल्याने ते बाधत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. सारांश, मासे हे जपूनच खावेत. ते बाधत असतील तर टाळावेत. माणसाचे जीवन अमूल्य आहे. हे जीवन मासे खाऊन मरण्यासाठी नाही. खवय्यांनी हे ध्यानात घ्यावे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content