HomeArchive‘एमएसएमई’च्या सुधारीत मर्यादा...

‘एमएसएमई’च्या सुधारीत मर्यादा लागू करण्याचे रिझर्व्ह बँकेचे आदेश!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
केंद्र सरकारने ‘आत्मनिर्भर पॅकेज’ घोषित करताना एमएसएमई क्षेत्राच्या वाढवलेल्या मर्यादा लागू करण्याचे दिलेले आदेश लागू करावेत, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँका, आर्थिक संस्था तसेच नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना दिल्याची माहिती ‘फिक्की’चे संचालक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
 
केंद्र सरकारने आत्मनिर्भर पॅकेज घोषित करताना सेवा क्षेत्र व उत्पादन क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना एकत्रित करून पात्रता निकष सुधारीत करताना एक कोटींची गुंतवणूक व 5 कोटी रूपयांची उलाढाल असणार्यास उद्योगांना सूक्ष्म श्रेणी, दहा कोटी रूपये गुंतवणूक व उलाढाल 50 कोटी रूपये असणार्याय उद्योगांना लघु उद्योग श्रेणी, तर 50 कोटी गुंतवणूक व 250 कोटी उलाढाल असणार्याय उद्योगांना मध्यम उद्योग श्रेणी देण्यात आली आहे. या नवीन श्रेणीप्रमाणे उद्योगांचे वर्गीकरण करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
 

 
 
हे वर्गीकरण करताना सेवा व वस्तूंच्या निर्यातीतून होणारी उलाढाल वगळून, उलाढाल निश्चिगत करण्याच्या सूचनाही रिझर्व्ह बँकेने 02 जुलै 2020च्या त्यांच्या आदेश क्रमांक RBI /2020-2021/10 अन्वये दिल्या असून या आदेशाची अंमलबजावणी 1 जुलै 2020पासून सुरू करण्यात आली आहे.
 
आत्मनिर्भर पॅकेजेच्या घोषणेप्रमाणे नवीन निकाषांमध्ये सूक्ष्म, लघु, व मध्यम श्रेणीमध्ये नव्याने समावेश झालेल्या उद्योगांना या पॅकेजचा लाभ अद्यापही मिळत नव्हता. रिझर्व्ह बँकेच्या या आदेशामुळे या सर्व घटकांना पॅकेजचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाल्याने व्यापारी व उद्योजक या दोन्ही घटकांची वाढीव भांडवलाची गरज पूर्ण होण्यात येणार्याँ अडचणी निश्चिदतपणे दूर होतील असा विश्वाभसही गांधी यांनी व्यक्त केला.
 “

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content