HomeArchiveचोरता हृदय हे...

चोरता हृदय हे…

Details
चोरता हृदय हे…

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
आपण अनेक प्रकारच्या चोर्‍यांविषयी ऐकले असेल. पण एखाद्याचे हृदय चोरीला गेल्याचे कधी ऐकले आहे का? या ‘चोरी’ची तक्रार पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याचे कधी पाहिले आहे का? अशा तक्रारीने बिचारे पोलीसदेखील निरूत्तर झाल्याचे कधी दिसले आहे का? नागपूर पोलिसांनी अलिकडेच चोरीला गेलेला 82 लाख रूपयांचा ऐवज संबंधितांना परत केला. त्यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांनी सांगितलेला किस्सा मनोरंजक आहे.

काही दिवसांपूर्वी एक तरुण नागपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये गेला. तेथे त्याने आपले ह्दय चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. आपली चोरीची तक्रार नोंदवून घ्यावी असा हट्ठच त्याने धरला. पोलिसांनी कायद्याची कलमे तपासून पाहिल्यानंतर इंडियन पिनल कोडमध्ये अशा प्रकारची हृदय चोरीची तक्रार नोंदविण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या तक्रारदाराला आपली अडचण समजावून परत पाठविले. आयुक्त उपाध्याय यांनी हा किस्सा पत्रकारांना सांगितला तेव्हा त्यांची चांगलीच करमणूक झाली.

यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर प्रश्न असा पडतो की, हृदयाची चोरी कधी होत नाही का? ती झाली नसती तर लैला-मजनू, रोमियो-ज्युलिएट, शिरी-फरहाद इत्यादी जगभरातील अमर झालेल्या प्रेमकथा कशा जन्माला आल्या असत्या? प्रेमभंग झालेल्या प्रियकर-प्रेयसीने कशा आत्महत्त्या केल्या असत्या? आपल्या सुंदर प्रेयसीने काही दिवसांत आपल्याला सोडून दिल्यानंतर एक दु:खी कष्टी प्रियकर म्हणतो,
महवशों की मेहरबानी हो चुकी
चार दिन की चांदनी थी, हो चुकी
(चंद्रमुखीची मेहरबानी होऊन गेली
चार दिवसांची चांदणी होऊन गेली.)

प्रियकराशी विवाहबद्ध झाल्यानंतर पत्नी बनलेली प्रेयसी काही काळ नक्कीच खूष असते. पण लग्नाआधी पाहिलेली स्वप्ने भंग होताना दिसताच पती-पत्नीपैकी एक जण तलाक देण्यापर्यंत टोकाची भूमिका घेतो. ही भूमिका पतीने घेतली असेल तर ती दु:खी पत्नी काय म्हणते पाहा:
तलाक दे रहे हो गुरूरो-कहर के साथ
मेरा शबाब भी लौटा दो मेरे महर के साथ।

(इतक्या घमेंडीत आणि क्रोधाने तू मला तलाक देत आहेस तर मग माझे सौंदर्यदेखील तुला लग्नात मिळालेल्या धनराशीसह (महर) परत कर.)
वरील दोन उर्दू शेर सादर करण्याचे कारण असे की, सच्चे प्रेम, हृदयाची चोरी आदी सारी बकवास आहे. प्रेमिकांचा विवाह झाल्यानंतर ते वास्तव जीवन जगू लागतात तेव्हा त्यांना या गोष्टींचा अनुभव येतो. एखादे प्रेम सफल होत नाही तोपर्यंत संबंधित तो किंवा ती हृदय चोरीला गेल्यासारखी बालिश तक्रार करतात. वास्तवात त्यांचे हृदय होते तिकडेच असते. फक्त प्रेमाच्या भावनेतून त्यांचा मेंदू बधिर झालेला असतो. नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेलेला तो तरूण अशा बधिर मेंदूवाल्यांपैकीच एक होता.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content