Saturday, July 13, 2024
Homeटॉप स्टोरी'कोकण पदवीधर'मधले 99...

‘कोकण पदवीधर’मधले 99 हजार मतदार फक्त ठाणे जिल्ह्यातले

निरंजन डावखरे यांच्यासारखा तरुण, तडफदार उमेदवार महायुतीला मिळाला आहे. गेली 12 वर्षे निरंजन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून आपल्या सुस्वभावाने आणि सक्रिय सहभागाने सर्वांची मने जिंकली. कोकण पदवीधर मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. यामध्ये विधानसभेचे 39 मतदारसंघ समाविष्ट आहेत. या मतदारसंघात 2,25,000 लाखांचे रजिस्ट्रेशन झाले असून यातील जवळपास 99,000 मतदार केवळ ठाणे जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली.

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतले महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ तीन हात नाका, ठाणे येथे आयोजित महायुती विजय संकल्प मेळाव्यास उपस्थित राहून जमलेल्या जनसमुदायास संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत निरंजन यांच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशनही त्यांनी केले.

ही निवडणूक ‘मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट’ अशा प्रकारच्या प्रचारातून आपल्याला लढवायची आहे. ‘फेक नॅरेटिव्ह’ दूर करून महाराष्ट्रात नवीन ‘नॅरेटिव्ह’ निर्माण करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ठाणे आणि कोकण विभागात प्रचंड यश प्राप्त झाले. काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करू. परंतु कोकणने त्यांना कोकणातूनच तडीपार केले. पुन्हा एकदा कोकणचा आशीर्वाद या निवडणुकीत महायुतीलाच मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

या मेळाव्यास रवींद्र चव्हाण, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, आ. गणेश नाईक, आ. मंदा म्हात्रे, कपिल पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!