Homeमुंबई स्पेशलमुंबईत ५ हजार...

मुंबईत ५ हजार ठिकाणी झाली ‘मन की बात’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या ऐतिहासिक संवादाचा शतकोत्सव मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभा क्षेत्रात तब्बल ५ हजारांहून अधिक ठिकाणी प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलेपार्ल्यातील म. ल. डहाणूकर महाविद्यालयातल्या केशवराव घैसास सभागृहात हजर राहून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकले. कार्यक्रमाला खा. पूनम महाजन, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आ. पराग आळवणी, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासह विलेपार्ले परिसरातील सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी समाजघटकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. महिला व बालविकास, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत भायखळा येथील मुंबई महिला कारागृहात कार्यक्रम पार पडला. विधान परिषदेतील भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने मागाठाणेत दहा विविध समाजघटकांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. यात विविध समाजघटकांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. त्यात घरेलू कामगार, रिक्षाचालक, आदिवासी, मुस्लिम बांधव, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी प्रतिनिधी, पापड उद्योगातील महिला आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक समाजघटकातील ५०० प्रतिनिधी अशा पाच हजार प्रतिनिधींनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. यावेळी उपस्थित कामगारांचा सन्मान करण्यात आला.

खा. गोपाळ शेट्टी पोईसर येथील कार्यक्रमात सहभागी झाले. खा. मनोज कोटक यांच्या उपस्थितीत पवई तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आ. अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत हनुमान नगर येथे कार्यक्रम संपन्न झाला. दहिसर विधानसभेत आ. मनीषा चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली ५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. आ. कॅप्टन तमिल सेल्वन यांनी सायन कोळीवाडा येथे कार्यक्रम घेतला. आ. मिहीर कोटेचा यांनी मुलुंड येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. आ. भारती लव्हेकर यांनी वर्सोवा येथे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकले.

आ. विद्या ठाकूर यांनी गोरेगाव लिंक रोड येथे कार्यकर्त्यांसोबत उपस्थित राहून कार्यक्रमाचे रेडिओ प्रसारण ऐकले. आ. योगेश सागर यांनी चारकोप येथील कार्यक्रमात सहभाग घेतला. आ. सुनील राणे यांनी बोरीवलीतील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. आ. प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनात सायन सर्कल येथे कार्यक्रम झाला. यावेळी गरजू महिलांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. आ. पराग शाह यांच्या उपस्थितीत घाटकोपर येथे कार्यक्रम घेण्यात आला.

भाजप मुंबई युवा मोर्चातर्फे नवीन युवा मतदारांना खास आमंत्रित करण्यात आले. यानिमित्ताने ओबीसी मोर्चाच्या वतीने ५० चहाच्या स्टॉलवर मोफत चहा वितरण करण्यात आले. अल्पसंख्याक आघाडीच्यावतीने शीरखुर्मा बेत करत प्रमुख दर्गा, मदरसा आणि उर्दू शाळांमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. भाजपा लीगल सेलतर्फे वकिल बांधवांच्या उपस्थितीत ईशान्य मुंबईत कार्यक्रम पार पडला. पश्चिम महाराष्ट्र आघाडीकडून खास मुंबईतील डबेवाल्यांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. दक्षिण भारतीय सेलने वरळीतील महिलांसाठी विशेष कार्यक्रम घेतला. उत्तराखंड सेलकडून २०० नागरिक पारंपारिक वेशभूषा करून कार्यक्रमात सहभागी झाले. संयुक्त महाराष्ट्र दालनात कामगार आघाडीचा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. भाजपा सांस्कृतिक सेलतर्फे आधार कार्ड, मतदार कार्डसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content