Homeमाय व्हॉईस३४ याचिका, ११३...

३४ याचिका, ११३ प्रतिवादी, २ लाख पाने आणि ५४ जणांचा फैसला!

शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुदत वाढवून दिल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या १० जानेवारीला यावर निकाल देणार आहेत. ३४ याचिका, ११३ प्रतिवादी, २.११ लाख पाने आणि ५४ जणांचा फैसला यावेळी होणार आहे.

वीस डिसेंबरला दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे सादर झाल्यानंतर हा निकाल सुनावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुदताढ देण्याचे कारण म्हणजे ३४ याचिकांची सहा गटात विभागणी करून दोन लाख ११ हजार पानांची प्रतिज्ञापत्रे, ११३ प्रतिवाद्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर ५४ आमदारांच्या संदर्भातील निर्णय त्यांना घ्यावयाचा आहे. वीस तारखेनंतर कागदपत्रे मुंबईला नेण्यासाठीच चार दिवस लागणार आहेत. त्यानंतर आधीच्या मुदतीमध्ये म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत निकाल द्यायला केवळ चार ते पाच दिवस राहत होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांची विनंती मान्य करत मुदतवाढ दिली आहे.

याचिका

त्याबद्दल समाधान व्यक्त करून नार्वेकर म्हणाले की, मागितली तितकी मुदतवाढ मिळाली नसली तरी किमान आता निकाल देणे शक्य होणार आहे. त्याप्रमाणे ते १० जानेवारीला या बहुचर्चित आणि ऐतिहासिक प्रकरणावर ते निकाल देतील.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी सार्वजनिक सुटीची मागणी

अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने त्यादिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

याचिका

माहितीच्या मुद्द्याद्वारे ही मागणी करताना सरनाईक म्हणाले की, राम मंदिराचे उद्घाटन ही घटना जगाच्या कानाकोपऱ्यात बघितली जाणार आहे आणि देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त अयोध्येत जाणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने २२ जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला सरनाईक यांच्या सूचनेची दखल घ्यावी, असे निर्देश दिले.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content