अमरावती शहरामध्ये एका दुचाकीने जाणाऱ्या तीन युवकांनी रस्त्याने जाणाऱ्या तब्बल जवळपास ३० ते ३५ गाड्या फोडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस गाड्या फोडणाऱ्यांचा शोध घेत आहे. शहरात मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे पोलीसयंत्रणा संतर्क झाली आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास तीन युवक पंचवटी चौकातून मोपेडने निघाले. यावेळी त्यांनी ज्या चारचाकी गाड्या दिसल्या त्यावर दगडफेक केली. लाचलचुपत प्रतिबंधक ऑफिसच्या समोरील इमारतीच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या गाड्यांनासुद्धा या माथेफिरूंनी लक्ष्य केले. हे तीनही युवक पंचवटीपासून तर तपोवन गेटच्या आत गेले. मात्र यादरम्यान ज्या काही चारचाकी गाड्या त्यांना मार्गात दिसल्या त्या त्यांनी दगड मारून फोडल्या. पंचवटी ते तपोवनपर्यंतचे सिसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.