Wednesday, December 4, 2024
Homeमुंबई स्पेशलरक्षाबंधनाला 25 लाख महिला...

रक्षाबंधनाला 25 लाख महिला पाठवणार फडणवीसांना राखी

महायुती सरकरच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील 25 लाख महिला रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या पाठवणार आहेत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत दिली.

भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.भाजपा  महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ,भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, संजय केनेकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.

महायुती सरकरच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळणारी प्रचंड लोकप्रियता पाहून उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच ते या योजनेवर टीका करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल अपप्रचार करत उद्धव ठाकरे यांनी

महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. करोडपतींच्या घरात जन्माला आलेल्यांना या योजनेचे मोल कळणारच नाही. महिलावर्गासाठी उपयुक्त योजनेची खिल्ली उडवून ठाकरे यांनी आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, असेही ते म्हणाले.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी योजना ही कायमस्वरुपी योजना असून महिलांनी या 18,000 रुपयांमधील किमान 3 हजार रुपयांचा विमा जरी उतरवला तरी त्यांच्या संपूर्ण परिवाराला सुरक्षाकवच मिळू शकेल, इतकी ताकद या योजनेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सरकार असलेल्या कर्नाटक, हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गृहलक्ष्मी योजनेचे आश्वासन देऊन काँग्रेसने मते घेतली आणि सत्ता आल्यानंतर योजना बंद केली. जनतेशी अशी लबाडी करणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेवर टीका करण्याचा अधिकारच नाही. लबाड पार्टीसोबत असलेल्या उद्धव ठाकरेंना या योजनेत पण लबाडीच दिसते यात काही नवल नाही, असे ते म्हणाले.

Continue reading

महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांचे निधन

महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) सुनिल रंगनाथ पावडे (वय ५४ वर्षे) यांचे सोमवारी रात्री जळगाव येथे ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पारनेर (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील दरोडी या त्यांच्या मूळ गावी उद्या बुधवारी (दि. ४) सकाळी अंत्यसंस्कार केले...

सफाळ्यात ८ डिसेंबरला शरीरसौष्ठव स्पर्धा

सफाळ्यातील अचानक मित्र मंडळाच्यावतीने येत्या ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे, सफाळे श्री २०२४ शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मिथुन पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत. पालघर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनने या स्पर्धेला मान्यता दिली आहे....

आंतरशालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत मुंबईचे घवघवीत यश

मुंबईच्या बोरीवली (पश्चिम) येथे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर, मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बीमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरशालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत मुंबई विभागाच्या मल्लखांबपटूंनी चमकदार कामगिरी करताना घवघवीत...
Skip to content