Homeबॅक पेजजनरेटिव्ह एआय स्टार्टअप्ससाठी...

जनरेटिव्ह एआय स्टार्टअप्ससाठी एडब्ल्यूएसकडून २३० दशलक्ष डॉलर

ऍमेझॉन वेब सर्विसेसने (एडब्ल्यूएस) जनरेटिव्ह एआय स्टार्टअप्ससाठी २३०दशलक्ष यूएस डॉलरची घोषणा करीत ग्लोबल जनरेटिव्ह एआय एक्सेलरेटरच्या विस्ताराची नुकतीच घोषणा केली. याचे उद्दिष्ट ८० संस्थापक आणि नवोदितांना (आशिया-पॅसिफिक आणि जपान एपीजेमधील २०) स्टार्टअप्सना या क्षेत्रात आणण्याचे आहे.

त्यांच्या गरजेनुसार तांत्रिक आणि व्यावसायिक प्रोग्रामिंगद्वारे त्यांच्या वाढीला गती देणे हा यामागचा उद्देश आहे. कंपनी या प्रदेशातील जनरेटिव्ह एआय स्पॉटलाइट प्रोग्रामअंतर्गत १२० प्री-सीड आणि सीड-स्टेज रेडी स्टार्टअप्स निवडेल, ज्यापैकी ४० भारतातील असतील.

एडब्ल्यूएस इंडियाचे स्टार्टअप इकोसिस्टमचे प्रमुख अमिताभ नागपाल म्हणाले की, जनरेटिव्ह एआय व्यवसायांना नवकल्पना वाढवण्याची, उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रचंड क्षमता देते. प्रारंभिक टप्प्यातील जनरेटिव्ह एआय दोन वेगळे पूरक कार्यक्रम जे स्टार्टअप्सच्या जीवनासाठी अनुकूल आहेत. ग्लोबल जनरेटिव्ह एआय एक्सीलरेटर आणि एपीजे जनरेटिव्ह एआय स्पॉटलाइट निवडक स्टार्टअप्सना त्यांच्या प्रगतीला गती देण्यासाठी, एडब्ल्यूएस क्रेडिट्स, टूल्स आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी डिझाइन केले आहेत. आम्ही भारतातील स्टार्टअप्सना या कार्यक्रमांसाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित करतो आणि देशात जनरेटिव्ह एआयआधारित बदल घडवून आणणाऱ्या स्टार्टअपला सक्षम बनवण्याची अपेक्षा करतो.

Continue reading

जागतिक बाजारात साखरेचे दर 5 वर्षांतल्या नीचांकी पातळीवर!

जागतिक साखर बाजारात एक मोठी उलथापालथ झाली असून, साखरेचे दर गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर कोसळले आहेत. ICE एक्सचेंजमधील कच्च्या साखरेचा वायदे भाव (Raw Sugar Futures) 14.37 सेंट्स प्रति पाऊंड इतका खाली आला आहे, ही एक अशी पातळी आहे,...

शहापूरच्या कन्या सुजाता मडकेंची यशस्वी झेप, सरनाईकांकडून प्रशंसा

“यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते” या शब्दात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत...

नोव्हेंबरपासून राज्यात हवामान कोरडे; मात्र 3-4 दिवस पावसाचेच!

यंदा उन्हाळ्यातच आलेला पाऊस हिवाळा सुरू झाला तरी मुक्काम हलवायला तयार नाही. मान्सून संपला; पण मान्सूनोत्तर अवकाळी पावसाचा खेळ अजूनही सुरूच आहे. आता बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तसेच ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात...
Skip to content