Homeटॉप स्टोरीमुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाने होणार...

मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाने होणार होता 2100 कोटींचा घोटाळा?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी कोविडच्या माध्यमातून मुंबईत 5000 खाटांच्या हॉस्पिटलच्या नावाने 2100 कोटींच्या जमीन घोटाळ्याचे नियोजन केले होते. राज्य सरकारच्या मालकीची ही जमीन स्वत:च्या परिचित बिल्डरकडून 2100 कोटी रुपये देऊन विकत घ्यायची असे षडयंत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सुरू केले होते, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत केला.

23 ऑक्टोबर, 2020 रोजी डॉ. किरीट सोमैया यांनी एका पत्रकार परिषदेद्वारा ठाकरे सरकारच्या या घोटाळाचा खुलासा केला होता. मुलुंड पूर्वमधील स्वास कन्स्ट्रक्शन कंपनीची जमीन या 5000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी योग्य असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या कमिटीने रिपोर्ट दिला. ही जमीन आयुक्तांनी रुपये 2100 कोटींमध्ये विकत घेण्याचे निर्देशही दिले. आयुक्तांच्या निदर्शनाखाली या कमिटीने स्वास कन्स्ट्रक्शन कंपनीची ही जमीन 5000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी उचित असल्याचा रिपोर्ट व निर्णय दिला. ती जमीन घेण्याची प्रक्रियाही सुरू झाली. 5000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी 2100 कोटी रुपयांची जमीन व 9500 कोटी रुपयांचे बांधकाम, हॉस्पिटलचे साहित्य व त्यासोबतचे कन्व्हेन्शन सेंटर असे मिळून एकंदर 12000 कोटी रुपयांचा प्रकल्प मुंबई महापालिका आयुक्तांनी गैरकायदेशीररित्या पुढे सरकवला, असेही ते म्हणाले.

या घोटाळ्याविरुद्ध महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॉ. सोमैयांनी 30 ऑक्टोबर, 2020 रोजी यांच्याकडे तक्रार दिली होती. राज्यपालांनी ही याचिका महाराष्ट्राच्या लोकायुक्तांकडे तपासासाठी पाठविली. आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेसचे, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हा घोटाळा थांबवण्याचे आवाहन केले होते. अशा 5000 खाटांच्या हॉस्पिटलचा निर्णय कोणाचा हे एक गूढ रहस्यच आहे. मुंबई महापालिका, आरोग्य मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय, कोविड टास्क फोर्स, नगर विकास मंत्रालय अश्या सगळ्याच विभागांनी हा निर्णय आमचा नाही, आम्ही असे हॉस्पिटल बांधण्याची शिफारस केलेली नाही असे स्पष्टपणे सांगितले. मुंबई महापालिकेने आमच्या एका माहिती अधिकार अर्जाच्या अंतर्गत कळवले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 जुलै 2020 रोजी कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत महापालिका आयुक्तांच्या “कानात” (खाजगीत) ही गोष्ट सांगितली आणि म्हणून महापालिका आयुक्तांनी सगळे नियम धाब्यावर बसून 4 दिवसांत मुलुंड येथील मुख्यमंत्र्यांच्या परिचित बिल्डरची, स्वास कन्स्ट्रक्शनची जमीन या 5000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी ताब्यात घेण्याचा उपद्व्याप सुरू केला, असेही सोमैया यांनी सांगितले.

आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी 6 ऑक्टोबर 2020 रोजी राज्य सरकारचे मुख्य सचिव यांना पत्र/अहवाल सादर केला आणि 5000 खाटांचे हॉस्पिटल कसे आवश्यक आहे व त्यासाठी मुलुंड येथील स्वास कन्स्ट्रक्शन कंपनी/बिल्डरची जमीन अत्यंत योग्य आहे, तिथे हॉस्पिटल उभे करावे, त्यासाठी मुंबई महापालिकेनी सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे असे त्यात म्हटले. ठाकरे सरकारने महापालिकेचा हा अहवाल (रिपोर्ट) हातात घेऊन स्वास बिल्डरकडून जमीन विकत घेण्याची प्रक्रियाही सुरू केली. यासाठी नगरविकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जलदगतीने कार्यवाही सुरू केली. 10 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र सरकारने ही जागा संपादित करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे मदत मागितली. हा 12000 कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचे सगळे पुरावे आम्ही लोकायुक्तांना दिल्यानंतर आता 11 जानेवारी 2021 रोजी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला एक पत्र पाठवून असे कळवले आहे की, 5000 खाटांच्या हॉस्पिटलकरिता मुंबई महापालिकेकडून कोणतीही जागा निश्चित करण्यात आलेली नाही. महापालिकेने यासंदर्भात जमीन निश्चित करण्याची जी प्रक्रिया केली होती ती आता आम्ही रद्द केली आहे. आमचे याआधीचे सगळे रिपोर्ट रद्द समजावे. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्तांचा 5000 खाटांच्या हॉस्पिटलच्या नावाने 2100 कोटींच्या जमीन खरी घोटाळा बारगळला, असा दावा किरीट सोमैया यांनी केली आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content