भारतातील २ ते ५ टक्के व्यक्ती हायपरहायड्रोसिसने पीडित असण्याचा अंदाज आहे. असे असतानादेखील या स्थितीबाबत जागरूकतेचा अभाव आहे. परिणामत: अनेक व्यक्तींना या वैद्यकीय स्थितीबाबत माहित नाही आणि ते नकळतपणे आजार सहन करतात. वेळेवर उपचार न केल्यास या आजाराचा दैनंदिन काम, मानसिक आरोग्य आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. एअरहोस्टेस म्हणून काम केलेल्या पाल्मर हायपरहायड्रोसिसने पीडित अशाच एका तरुणीवर जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने बायलॅटरल थोरॅकोस्कोपिक सिम्पॅथेक्टॉमी (व्हीएटीएस)च्या माध्यमातून यशस्वीरित्या उपचार केले. ही सुरक्षित, किमान इन्वेसिव्ह, डे-केअर शस्त्रक्रिया आहे, ज्यामधून त्वरित परिणाम मिळतात.
या महिला रुग्णाला किशोरावस्थेपासून लक्षणे जाणवत होती आणि गेल्या काही वर्षांपासून तिने अनेक वैद्यकीय उपचारदेखील केले. पण त्यामधून हा आजार कायमसाठी बरा झाला नाही. या आजारामुळे तिला तिची नोकरी सोडावी लागली, तसेच तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्यासोबत मनोबल कमी झाले. डॉ. विमेश राजपूत, कन्सल्टण्ट, थोरॅसिस सर्जरी यांनी या महिला रूग्णावर बायलॅटरल थोरॅसिस्कोपिक सिम्पॅथेक्टोमी (व्हीएटीएस) प्रक्रिया केली. डॉ. सावी कपिला, कन्सल्टण्ट, अॅनेस्थेसियोलॉजी यांनी कुशलपणे अनेस्थेसियाचे व्यवस्थापन केले. या एक तासाच्या शस्त्रक्रियेमध्ये हातांना जास्त घाम येण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सिम्पॅथेटिक नसांना प्रतिबंध केला जातो.

हायपरहायड्रोसिस सामान्य आजार नसून शारीरिक अक्षमता आणणारा आजार आहे, जो रूग्णांना समाजापासून वेगळे करू शकतो. त्यांच्यामध्ये चिंता व नैराश्य आणू शकतो, असे जसलोक हॉस्पिटलमधील थोरॅसिस सर्जन डॉ. विमेश राजपूत म्हणाले. अनेक रूग्ण अधिक प्रमाणात येणाऱ्या घामाकडे दुर्लक्ष करतात. त्यांना ते सामान्य असल्यासारखे वाटते. पण काळासह या आजारामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, समाजामध्ये उपस्थिती कमी होते आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. लवकर निदान आणि वेळेवर शस्त्रक्रिया उपचारामुळे आजारामधून पूर्णपणे बरे होण्यासोबत जीवनाचा दर्जा सुधारू शकतो, असेही ते म्हणाले.
शस्त्रक्रियेनंतर महिला रूग्णाला लक्षणे त्वरित व पूर्णपणे बरी झाल्याचे जाणवले, ज्यासह ती भीती, संकोच व अस्वस्थतेला दूर करत पुन्हा सामान्य दैनंदिन काम करू लागली. या केसबाबत मत व्यक्त करत जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्हणाले की, हायपरहायड्रोसिसचे योग्य निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्हीएटीएस सिम्पॅथेक्टोमीसारख्या किमान इन्वेसिव्ह, शॉर्ट-स्टे प्रक्रिया त्वरित आराम देऊ शकतात आणि रूग्णांचा आत्मविश्वास वाढवू शकतात. याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करणे आवश्यक आहे, ज्यामुळे व्यक्तींना या आजारावर उपचार करता येऊ शकतो हे समजेल आणि वेळेवर वैद्यकीय उपचार होऊ शकतात.

